पारवा येथे कृषी योजनांचा माहिती मेळावा

    दिनांक :25-Aug-2023
Total Views |
घाटंजी :
पारवा ग‘ामपंचायत सभागृहात 12 ते 24 ऑगस्टदरम्यान कै. वसंतराव नाईक पुण्यतिथीनिमित्त Agriculture Scheme कृषी योजनांचा मेळावा कार्यक‘म घेण्यात आला. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी आत्मा समिती घाटंजीचे गणेश मुद्दलवार, तंटामुक्ती समिती पारवाचे अध्यक्ष निकम, उपविभागीय कृषी अधिकारी राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी, प्रमुख मार्गदर्शक व घाटंजी तालुका कृषी अधिकारी राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. हरितक‘ांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक‘माला प्रारंभ करण्यात आला.
 
 
Agriculture Scheme
 
Agriculture Scheme कृषी योजनांचा माहिती मेळावा योजनांचा कार्यक‘मात प्रमुख मार्गदर्शक माननीय राठोड उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी उपस्थित शेतकर्‍यांना, स्प्रिंकलर, ठिबक, कृषी यांत्रिकीकरण, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, ग‘ीन हाऊस, पॉलिहाऊस उभारणी, मु‘यमंत्री शाश्वत सिंचन कार्यक‘म अंतर्गत शेततळे, तसेच प्रधानमंत्री सुष्म अन्नप्रकि‘या उद्योगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उत्पादकता लक्षात घेता विशेष शेतकरी प्रशिक्षण झचऋचए योजनेअंतर्गत राबविण्याच्या बाबतीत उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना निर्देश देण्यात आले. कार्यक‘मात शेतकर्‍यांना कापूस, तूर, सोयाबीन कीड व रोग व्यवस्थापनाबाबत शेतकर्‍यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक‘माला अक्कलवार मंडळ कृषी अधिकारी पारवा, चांदूरकर कृषी पर्यवेक्षक पारवा, कार्यक‘मासाठी लालाजी पोटपल्लीवार ग‘ामपंचायत सदस्य, पारवा कृषी सहायक मेश्राम, कृषी सहायक सावरगाव देशट्टीवार, खरुडकर यांनी विशेष प्रयत्न केले.