प्रज्ञानंदने कॅण्डिडेट स्पर्धेत स्थान मिळविल्याचा आनंद : आई नागलक्ष्मी

    दिनांक :25-Aug-2023
Total Views |
बाकू (अझरबैजान), 
आपल्या मुलाने कॅण्डिडेट chess tournament बुद्धिबळ स्पर्धेत स्थान मिळविल्याचे बघून आनंद झाला. 18 वर्षांच्या मुलाने बुद्धिबळात यशाचा मोठा पल्ला गाठला आहे, असे बुद्धिबळातील खळबळजनक किशोरवयीन खेळाडू आर. प्रज्ञानंदची आई आर. नागलक्ष्मी म्हणाली. विद्यमान विश्वविजेत्याशी कोण सामना करेल हे आव्हान निश्चित करण्यासाठी कॅण्डिडेट ही अंतिम स्पर्धा आहे. गुरुवारी बाकू येथे फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न प्रथम विश्वमानांकित मॅग्नस कार्लसनने संपुष्टात आणले. कार्लसनने प्रज्ञानंदला 1.5-0.5 ने पराभूत केले. फिडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणारा प्रज्ञानंद हा देशातील सर्वात तरुण व विश्वनाथन आनंदनंतर केवळ दुसरा खेळाडू ठरला.
 
 
PRAGYANAND-MOTHER
 
नागलक्ष्मी यांनी आपल्या यशात मोठी भूमिका बजावली असून त्यांनी मुलाला chess tournament बुद्धिबळाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित केले. जवळपास सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याच्यासोबत काम केले आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषकात प्रज्ञानंद इतका पुढे आला याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि त्याहूनही अधिक म्हणजे त्याने कॅण्डिडेट स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला आहे. प्रज्ञानंद बाकूहून जर्मनीला रवाना होणार आहे आणि आम्ही 30 ऑगस्ट रोजी भारतात परतणार आहे, असे त्या म्हणाला. .
 
 
प्रज्ञानंदने एरिगाइसीवर विजय नोंदवत उपांत्य फेरी गाठली व त्यात तृतीय विश्वमानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र प्रज्ञानंदला कार्लसकडून पराभव पत्करावा लागला. प्रज्ञानंदच्या यशाबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा चेन्नईहून फोन आल्यानंतर आमचे कुटुंब अतिशय भारावून गेले होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आमची मेहनत सार्थकी ठऱली : रमेशबाबू
आर. प्रज्ञानंद फिडे chess tournament बुद्धिबळ विश्वचषकात उपविजेता ठरल्याबद्दल त्याचे वडील रमेश बाबू यांनी आनंद व्यक्त केला. रमेशबाबू बुद्धिबळाच्या खेळातील तज्ज्ञ नाही, परंतु त्यांनी आपल्या मुलाला या खेळात निपूण करण्यासाठी चांगले पाठबळ दिले व त्याला पोषक वातावरण दिले. आमच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीची व काळजीचे फळ मिळाले. प्रज्ञानंद बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याचा खूप आनंद झाला, परंतु त्याने चांगली कामगिरी करावी, यासाठी आम्ही त्याच्यावर कधीच दबाव आणला नाही. मी त्याच्या कामगिरीवर खूप खूश आहे, असे त्यांनी सांगितले.