वर्धा-नांदेड नवीन लाईनवर देवळी स्टेेशन कार्यन्वित

26 Aug 2023 19:21:42
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
जवळपास 11 वर्षांपासुन रेंगाळत पडलेल्या वर्धा नांदेड हा रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागले असुन या मार्गावरील Deoli station देवळी रेल्वे स्टेशन कार्यन्वित झाले असल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 रोजी या नवीन मार्गावरील पहिले स्टेशन देवळी स्टेशन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह 32 रुटसह कार्यान्वित झाले आहे.
 
Deoli station
 
या मार्गावर वर्धेपासून 15 किमी अंतरावर Deoli station देवळी हे पहिले स्थानक आहे. या रेल्वे मार्गांची संख्या 3 (1 मुख्य रेल्वे मार्ग, 2 सामान्य लूप लाइन, सिग्नल्सची संख्या 12 मुख्य अधिक 3 शंट सिग्नल, लोको इंजिन स्थिर करण्यासाठी 1 साइडिंग देखील कार्यान्वित केले, एकूण मार्गांची संख्या 32, विभागातील कोणतीही घटना घडल्यास विभाग नियंत्रणाशी बोलण्यासाठी 15 किलोमीटरच्या संपूर्ण विभागात 1 किमी अंतराने सॉकेट आहे. तसेच हा मार्ग 284.65 किमीचा असुन 27 स्थानकं आहेत. या मार्गाची किंमत 3435.48 कोटी झाली आहे. 2139 हेक्टर पैकी 1912 हेक्टर म्हणजे 90 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. या आर्थिक वर्षात 38.61 किमी कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या रेल्वे मार्गावर35 मोठे तर 79 छोटे पूल आणि रोड अंडर ब्रिज पूर्ण झाले आहेत. या नवीन रेल्वे मार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रामुख्याने वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड या 5 जिल्ह्याना फायदा होणार आहे.
Powered By Sangraha 9.0