नागपूर,
Sitar-Artist-Nagpur लोकशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित, म. पां. देव स्मृती लोकांची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्पिक मॅकेच्या संयोजनाने सतार वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. Sitar-Artist-Nagpur वीणा आणि संतुराचे मिश्र स्वरूप असलेली सतार हे भारतीय संगीतातील प्रमुख वाद्यांपैकी एक. Sitar-Artist-Nagpur हे वाद्य वाजवणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक कुशल दास आणि त्यांना तबल्यावर साथ देणारे सुप्रसिद्ध तबलावादक संदीप घोष यांनी भीमपलाश ह्या रागाचे अप्रतिम सादरीकरण केले.
Sitar-Artist-Nagpur या प्रसंगी कार्यक्रमाला लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभू देशपांडे, सचिव शमनोहर ढोक, कोषाध्यक्ष शामकांत पुसदकर, दीपक फडणवीस, डॉ. निशा कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्य उमा मिश्रा, पर्यवेक्षक रजनी राजूरकर उपस्थित होते. Sitar-Artist-Nagpur प्रास्ताविक स्पीक मॅकेच्या सदस्य आणि भिडे कन्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका पल्लवी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिफा शेख, परिचय पूर्वा गव्हाळे व अल्फिशा शेख, आभार प्रदर्शन हर्षिता काळे या विद्यार्थिनींनी केले. Sitar-Artist-Nagpur कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. स्वाती मोहरीर, जयश्री धात्रक, मोनाली करडभाजणे, श्रीकांत देशमुख आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाला पालक वर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
सौजन्य : डॉ. अरुंधती वैद्य, संपर्क मित्र