नागपूर,
द्वितीय मानांकित आरुष चित्रेने Arush Chitre पहिल्या फेरीपासून सुरु केलेली विजीय मोहीम अंतिम म्हणजे आठव्या फेरीतही कायम ठेवली. या कामगिरीच्या बळावर आरुष गुणसंख्या सर्वाधिक ८ करीत नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित ७६ व्या आठवडी जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाचा मानकरी ठरला.
काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या इनडोअर सभागृहातील एनडीसीएच्या सभागृहात ही स्पर्धा झाली. सातव्या फेरीनंतर ७ गुणांसह एकमेव आघाडीवर असलेल्या Arush Chitre आरुषने अंतिम फेरीत कुमार झा याला पराभूत करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. चार बुद्धिबळपटूंची गुणसंख्या ६ अशी सारखी राहिली. त्यामुळे स्पर्धेचे मुख्य पंच प्रवीण पानतावणे यांनी तांत्रिक गुणांच्या आधारे ऋषिकेश लोहितला द्वितीय, कुणार झा याला तिसरे, अवंती जुनघरेला चौथे, ओमप्रकाश सोनीला पाचवे स्थान दिले. तीन बुद्धिबळपटूंची गुणसंख्या ५.५ राहिली. तांत्रिक गुणांच्या आधारे युगांत रामटेके सहाव्या, आदित्य कमलापूरकर सातव्या तर ईश्वर रामटेके आठव्या स्थानी राहिले. आदित्य जुनघरे नवव्या व प्रमोद रामटेके दहव्या स्थानी राहिले. स्पर्धेचे मुख्य पंच प्रवीण पानतावणे यांच्या हस्ते स्पर्धेत पहिल्या दहा स्थानावरील बुद्धिबळपटूंना रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले.