सहकारमहर्षी यादवराव पडोळे यांना आदरांजली

27 Aug 2023 19:54:11
तभा वृत्तसेवा
भंडारा, 
Sahkar Maharshi Yadavrao Padole सहकार महर्षी यादवराव पडोळे यांच्या 20 व्या पुण्यतिथी निमित्य भेट त्यांचे सुपूत्र डॉ.प्रशांत पडोळे यांच्या निवासस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी स्व.यादावराव पडोळे यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रध्दांजली अर्पण करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 
 
Sahkar Maharshi Yadavrao Padole
 
राज्याच्या सहकार क्षेत्रातील मोलाचे योगदान देणारे बहुजन कुणबी समाजाचे नेते म्हणून स्व.यादवराव पडोळे यांची ओळख आहे. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची सेवा करीत बहुजनांच्या हाताला काम देण्याचे कार्य त्यावेळी केले. जिल्ह्यात किसान दुग्ध संघ, जिल्हा बँक यांचे नेतृत्व करीत विविध पदही त्यांनी भूषविले. आज त्यांचा वारसा त्यांची मुले डॉ.प्रशांत पडोळे आणि विवेक पडोळे हे पुढे नेत आहेत. वडिलांनी केलेल्या समाजसेवेची जाणीव ठेवून वेळोवेळी ते विविध प्रकारे गरजूंची सेवा करीत आहेत. समाजसेवेची तळमळ असलेले डॉ.प्रशांत पडोळे यांनी स्व. यादवरावजी पडोळे मेमोरियल हास्पिटल अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर सेंटरची भंडारा शहरात उभारणी करून या माध्यमातून गोरगरीबांची अविरत सेवेचे व्रत सुरू आहे.  Sahkar Maharshi Yadavrao Padole त्यांच्या कार्याची दखल घेत 26 ऑगस्ट रोजी भंडारा येथे जनसंवाद यात्रेदरम्यान महाराष्ट— राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ.पडोळे यांच्या सहकार नगर भंडारा येथील निवासस्थानी भेट घेतली. प्रसंगी स्व.यादवराव पडोळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. भेटी दरम्यान मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या काळात केलेल्या विकासकामांचे पुस्तक भेट देण्यात आले.
 
यावेळी खासदार सुनिल मेंढे, माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, महामंत्री प्रशांत खोब्रागडे, जि.प.सदस्य विनोद बांते तसेच शोभा यादवराव पडोळे, डॉ.प्रशांत पडोळे, डॉ.प्रांजली पडोळे, विवेक पडोळे, रुतुजा पडोळे, रिधिमा पडोळे, शार्दूल पडोळे, शिवाय पडोळे, बावणे कुणबी समाज सेवा मंडळ अध्यक्ष सदानंद इलमे, कार्याध्यक्ष धनराज झंझाळ, युवा समिती अध्यक्ष उमेश मोहतुरे, संचालक सुर्यकांत इलमे, अनुप ढोके, अजित आस्वले, क्रिष्णा उपरिकर, गोपाल डोकरीमारे, डॉ. प्रविन सावरबांधे, डॉ.रोकडे, अ‍ॅड.संतोषसिंग चव्हान, डॉ.हेमंत जांभुळकर, विक्की सार्वे, प्रशांत डोनारकर, नेहाल भुरे, हरीचंद्र बाभरे तसेच प्रतिष्ठीत नागरिक व समाजबांधव उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0