इस्रोने केली सूर्य मिशनची मोठी घोषणा

    दिनांक :28-Aug-2023
Total Views |
नवी दिल्ली,  
Surya mission : चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आता सूर्याचा अभ्यास करण्यास सज्ज झाले आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी यापूर्वीच याबाबत माहिती दिली आहे. आता इस्रोने सूर्य मोहिमेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आदित्य एल1 मिशनच्या प्रक्षेपण तारखेची घोषणा करताना, इस्रोने ट्वीटरवर पोस्ट केले की मिशन 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता प्रक्षेपित केले जाईल. ISRO ने सांगितले की, आदित्य-L1 हा श्रीहरिकोटा येथून सूर्याचा अभ्यास करणारा पहिला उपग्रह असेल.
 
Surya mission
 
चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सूर्य मोहिमेबाबत अनेक अपडेट्स दिले असले तरी आता या मोहिमेच्या प्रक्षेपणाची प्रशंसा आणि वेळही समोर आली आहे. (Surya mission) सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे मिशन सुरू केले जाईल, असे सोमनाथ यांनी सांगितले होते. सूर्याचे तापमान, त्याचा ओझोन थरावर होणारा परिणाम, अतिनील किरणांचा अभ्यास करणारी सूर्य मिशन ही पहिली भारतीय मोहीम आहे.