कोतवाल डोंगा जमिनीबाबत योग्य कार्यवाहीचे आश्वासन

Kotwal donga land-ngp नागरिक उपस्थित होते

    दिनांक :28-Aug-2023
Total Views |
नागपूर,
 
Kotwal donga land-ngp पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक 11, स्वागत नगर येथील कोतवाल डोंगा जमिनीचा विषय मुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्या माध्यमातून पुढे सरकला. 1950 सालापासून जमिनीच्या मालकीबाबतचा हा प्रश्न रेंगाळलेला आहे. त्याबाबत शासनाकडे अनेकदा अर्ज विनंत्या करण्यात आल्या होत्या. Kotwal donga land-ngp मात्र फाईली या टेबलावरून त्या टेबलावर जाण्याशिवाय दुसरा दुसरा कुठलाही निर्णय याबाबत होत नव्हता.
 
 
Kotwal donga land-ngp
 
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्यापुढे हा विषय ठेवण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच प्रस्ताव बनवून शासनाला पाठवण्याचे व समाधानकारक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. Kotwal donga land-ngp बैठकीत भाजप पश्चिमचे महामंत्री विनय कडू, मंडळ उपाध्यक्ष विनीत पाठक, ॲड. योगेश यादव, मुकेश यादव, चव्हाण, दिगंबर लांढे व नागरिक उपस्थित होते.
 
सौजन्य : धनराज तेलंग, संपर्क मित्र