गडचिरोली जिल्ह्याची ओळख संपन्न, समृद्ध करण्याचा प्रयत्न
28 Aug 2023 12:53:22
नागपूर,
Nitin Gadkari वनवासी भागातील लोकांना संस्कारांबरोबरच रोजगारही देण्याचा लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचा प्रयत्न असून, गडचिरोली जिल्ह्याची ओळख संपन्न, समृद्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या एकलव्य एकल विद्यालय शिक्षक, पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप आज उत्साहात झाला. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात आयोजित सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. इंडिया टीव्हीचे मुख्य संपादक रजत शर्मा, जितेंद्रनाथ महाराज, संस्थेचे अध्यक्ष अरुण लखानी, उपाध्यक्ष केशव मानकर, सचिव राजीव हडप, बाळ अंजनकर, अतुल मोहरीर, धनंजय बापट, अतुल शिरोडकर, डॉ. मुरलीधर चांदेकर, डॉ. राजीव पोतदार, रूपेश ढेपे, वसंत चुटे, अनिल जोशी हे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की, आदिवासी, मागास भागातील नागरिकांना चांगले जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. पूर्व विदर्भात 6 हजार मालगुजारी तलाव आहेत. तुम्हाला मत्स्यबीज दिले जाईल. आवश्यक तंत्रज्ञान शिकवू. झिंग्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. दिवाळीमध्ये 1200 पुरुष शिक्षक आणि पर्यवेक्षकांना शर्ट-पॅण्ट तसेच महिलांना साड्या पाठविल्या जाणार आहेत. प्रत्येक गावात फळ व पर्यावरणपूरक अशी 5 झाडे लावा. पुढील वर्षी संस्थेचे 1 लाख कार्यकर्ते तयार व्हावेत, अशी सूचना करीत नागरिकांना त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहनही केले.Nitin Gadkari यात 80 जी सवलत असल्याचेही ते म्हणाले.जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, समाजात संत, ऋषी आणि देवत्वाला सन्मान मिळत असतो. हे सर्व तुमच्यात असल्याने तुम्हाला वारंवार भेटण्याची इच्छा होतेे. तुमचे कार्य हे सैनिकांसारखेच आहे. नितीन गडकरी समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करीत आहेत.अनुपमा देशपांडे, रवींद्र फडणवीस, चंदू पेंडके आदींसह राजेंद्र प्रधान (कुरखेडा), संदीप भोरगिल (शेंबाळ पिंपरी), जनार्दन कठाळे (धानोरा), पुरुराम भोगा (गडचिरोली जिल्हा), माला रणदिवे (चिमूर), मनीषा भोयर (गोंदिया जिल्हा), अजय तायडे (अकोट तालुका), नीलेश पालवे (बुलडाणा जिल्हा), सुरेखा चव्हाण (पांढरकवडा तालुका), विनोद तडलवार (ताडगाव), रमेश भैसेकर (धारणी) आदी उत्कृष्ट शिक्षक, पर्यवेक्षकांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रशांत बोपर्डीकर, आभारप्रदर्शन भारत बुजाडे यांनी केले.