बुलढाणा,
शालेय शिक्षण विभागाने 10 सप्टेंबर रोजी आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. School Education जिल्हा परिषदांच्या 1 हजार 436 शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या 1 हजार 436 शाळांमध्ये एकाच दिवशी आजी- आजोबा दिन साजरा केल्यानंतर कार्यालयीन दिवशी जिल्हास्तरावरही हा उपक्रम राबविला जाईल.
शाळेतील अनुभवासह आजी- आजोबांचे अनुभव, त्यांच्या हितगूज मधून मिळणारी माहिती, School Education गोष्टी पाल्यांच्या जडणघडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी- आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पागोष्टी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख व्हावी यासाठी आजी-आजोबा दिवस शाळेत साजरा केला जाणार आहे. आजी, आजोबांनाही नातवंडांची शाळा पहायला मिळावी तसेच त्यांचाही विरंगुळा व्हावा, या उदात्त हेतुने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची सध्या विविध शाळांमध्ये तयारी सुरू आहे.