मराठा समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा

28 Aug 2023 15:36:16
वाशीम, 
Maratha community स्थानिक वाटाणे लॉन येथे २७ ऑगस्ट रोजी मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे होते. तर माजी आ. विजय जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे, जि. प. सदस्य पांडूरंग ठाकरे, वाशीम बाजार समितीचे सभापती दामुअण्णा गोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महादेव काकडे, वाटाणे लॉनचे व्यवस्थापक दिनकर वाटाणे, ज्येष्ठ विधिज्ञ शामराव उंडाळ, दिलीपराव नानोटे, जयदेवराव गहुले, राजेश दहातोंडे, साहेबराव मापारी, नारायण बारड, बळीराम कपले यांची उपस्थिती होती. तर प्रा. रघुनाथ उखळे यांनी सांगीतले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात ग्रामिण भागातील मराठी मुले टिकावी, ती पुढे जावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
 
 
Maratha Comunittes
 
तसेच समाजात असंख्य प्रश्न व अडचणी आहेत. परंतु मंडळाच्या सुध्दा काही मयार्दा आहेत. तेंव्हा सामाजीक प्रश्नाची सोडवणुक करण्यासाठी मराठा समाजातील पुढारी व धुरीणांनी समोर येण्याची गरज आहे.. दरम्यान, हभप गोपालदास महाराज यांच्या हस्ते मराठा समाज सेवा मंडळाच्या नवीन कार्यालयाचे भुमिपुजन करण्यात आले. त्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा व पालकांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरव केला़ कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे व प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली.Maratha community कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नंदकिशोर खाडे यांनी केले. कार्यक्रमास बळीराम ईढोळे, तुकाराम शेवाळे, श्रीराम नानोटे, अ‍ॅड. सुरेश टेकाळे, तानाजी कव्हर, शंकर उजळे, टि.बी. आरू, डॉ. सचिन कड, गोविंद चतरकर, रतन पाटील भिसे, गजानन आरू, सुभाष बोरकर, गुलाबराव जाधव, नारायणराव गायकवाड, अंबादास कुटे, दिनकर बोडखे, प्रा. योगेश्वर निकस, संजय भुरभुरे, दशरथ कड, प्रा. सुभाष कव्हर, रावसाहेब राहाणे, साहेबराव शिंदे, किशोर लहाने, वसंतराव अवचार, ज्ञानेश्वर वाघ, प्रल्हाद पौळकर, भागवत मापारी यांच्यासह समाजबांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
 
Powered By Sangraha 9.0