मानोरा,
Farmers get compensation तालुक्यात गत वर्षीच्या सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील कपाशी, तूर, सोयाबीन व फळबागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचा पंचनामा होऊन बाधित शेतकर्यांना अनुदान देण्याची मागणी तालुक्यात विविध स्तरातून करण्यात आली होती.

परंतु शासकीय व प्रशासकीय यंत्रणेने पर्जन्यमानाच्या आकडेवारीकडे बोट दाखवून बाधित शेतकर्यांना वार्यावर सोडण्याचा प्रकार चालविला होता. लोकप्रतिनिधी उदासीन असतांना प्रत्यक्षात शेतकर्यांना आर्थिक मदतीची कुठलीच कारवाई होत नसल्याने परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने मनोहर राठोड व पं.स.च्या सदस्या छाया राठोड यांनी सतत पाठपुरावा करत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चार दिवस आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. Farmers get compensation राठोड दाम्पत्यांच्या आंदोलनाच्या फलिताने गतवर्षी जून व जुलै या दोन महिन्यात सततच्या पावसामुळे मानोरा तालुक्यातील २२ हजार ७७७ शेतकर्यांना १३ कोटी ७५ लक्ष ६५ हजार १०५ एवढा निधी बाधित शेतकर्यांना दोन हेक्टरची लाभ मर्यादा ठरवून ऑनलाइन पद्धतीने शेतकर्याच्या खात्यात हा दुष्काळ निधी जमा होणार असल्याची माहिती परिवर्तन शेतकरी संघटनेचे प्रवर्तक राठोड यांनी दिली आहे. सन २२ मधील माहे जून, जुलै हे दोन महिने मानोरा तालुक्यातील शेतकर्यांसाठी दुर्दैवी ठरले होते. या दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतातील उभे पीक शेतकर्यांच्या डोळ्यादेखत पाण्याखाली जात असताना शेतकरी त्या पिकाला वाचू शकला नाही.
शेतीसाठी काढलेले कर्ज आता फेडावे कसे हा यक्ष प्रश्नः शेतकर्यांना पडला असताना प्रशासकीय यंत्रणेने पर्जन्यमानाच्या निकषावर बोट ठेवून शेतकर्यांना वार्यावर सोडले होते याबाबत परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने स्थानिक महसूल प्रशासनाकडे वारंवार निवेदन, स्मरणपत्रे देत शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करत असताना प्रशासकीय स्तरावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नव्हती. त्यामुळे गतवर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मनोहर राठोड व पं. स.च्या सदस्या छाया राठोड यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. Farmers get compensation या उपोषणाला तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी पाठिंबा देत रामराव चव्हाण सह पत्रकार मनोहर चव्हाण, धमेद्र जाधव सुनील पवार हेही दाम्पत्यांच्या आंदोलनाच्या सहभागी झाले होते. सदर आंदोलनाची दखल आ देवेंद्र भुयार व. आ. इंद्रनील नाईक यांनी घेत मध्यस्थी करून उपोषण सोडविले. आ. भुयार व आ. नाईक यांनी हा मुद्दा सभागृहात मांडून मानोरा तालुक्यातील शेतकर्यांना आर्थिक मदतीची मागणी लावून धरल्यामुळे बाधित शेतकर्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने अखेर राठोड दापत्यांच्या आंदोलनाला यश आल्याने तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.