श्री नरकेसरी प्रकाशनच्या ‘मधुकर भवन’चे थाटात लोकार्पण
दिनांक :31-Aug-2023
Total Views |
नागपूर,
Shree Narkesari Prakashan : तरुण भारताचे संचालन करणार्या श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडच्या हिंगणा एमआयडीसी कार्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मधुकर भवन’चे लोकार्पण रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते आज गुरुवार, 31 ऑगस्ट रोजी थाटात करण्यात आले. याप्रसंगी रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी विशेषत्वाने, तसेच प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विशेष अतिथी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Shree Narkesari Prakashan) श्री नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर व प्रबंध संचालक धनंजय बापट उपस्थित होते. तरुण भारतच्या उभारणीत आणि प्रांरभीच्या काळात मोलाचे सहकार्य करणारे व भरीव योगदान देणारे करणारे रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव तरुण भारतच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत या नवीन इमारतीला ‘मधुकर भवन’ म्हणून देण्यात आले आहे.