जिल्हा परिषदेत 875 रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती

04 Aug 2023 21:12:15
यवतमाळ, 
Yavatmal Zilla Parishad यवतमाळ जिल्हा परिषदच्या आस्थापनेवरील गट क च्या एकूण 25 संवर्गातील 875 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ही पदे जिपच्या विविध विभागांमधील आहेत. ही पदे भरण्याबाबत सन 2023 च्या सरळसेवा पदभरतीची जाहिरात zpyavatmal.gov.in या यवतमाळ जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार गट क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांसाठी अर्ज भरण्याची सुरवात 5 ऑगस्टपासून होणार असून 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज भरता येतील.
 
 
zp dkls;
 
Yavatmal Zilla Parishad इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबलिंकवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केले आहे. या पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी जिप यवतमाळच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, अथवा मदतीसाठी 07232-242442 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0