विदेशात मृत्यू झाल्यास लगेच आणता येणार मृतदेह

04 Aug 2023 11:41:50
नवी दिल्ली,
death In abroad परदेशात भारतीय नागरिकाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह मायदेशी आणण्याची प्रकि‘या आता सोपी होणार आहे. त्यासाठी सर्व एअरलाइन्स एजन्सीकडून गुरुवारपासून ‘ओपन ई-केअर प्लॅटफॉर्म’ हा प्लॅटफॉर्म सुरू झाला आहे. यानंतर, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना फक्त अर्ज करावा लागेल. अर्ज मंजूर करणे आणि परदेशातून मृतदेह भारतात आणणे ही प्रकि‘या जलदगतीने केली जाईल.
 
 
death In abroad
 
परदेशात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यास मृतदेह आणण्यासाठी कुटुंबाला दीर्घ प्रकि‘या करावी लागते. कधीकधी यासाठी एक आठवडा किंवा त्याहून अधिक दिवस देखील लागतात. मृत्यू असामान्य परिस्थितीत झाला असल्यास ही मुदत आणखी वाढते. काही वेळा भारतीय परराष्ट्र मंत्रालयालाही हस्तक्षेप करावा लागतो. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून परदेशातून भारतीय नागरिकांचे मृतदेह आणण्याची प्रकि‘या सुलभ करण्याची मागणी होत होती. death In abroad आता या दिशेने सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.
‘ओपन ई-केअर’ म्हणजे काय?
सर्व विमान कंपन्यांनी मिळून ओपन ई-केअर प्लॅटफॉर्म तयार केला आहे. परदेशात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यास मृतदेह लवकरात लवकर भारतात आणता येईल, याचा निर्णय होईल. death In abroad यासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यानेच अर्ज करावा. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे तपासल्यानंतर लवकरात लवकर मृतदेह आणण्याची प्रक्रिया केली जाईल.
अशी असेल प्रक्रिया
ओपन ई-केअर प्लॅटफॉर्म एखाद्या विभागाप्रमाणे काम करेल, जो दिल्ली विमानतळावर सुरू होईल. देशातील सर्व विमानतळ याला ऑनलाईन माध्यमातून जोडले जातील. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी एकदा अर्ज करावा. यानंतर, सर्व माहिती आणि व्यवस्था संबंधित विभाग किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी एअरलाइन्स कंपन्यांची असेल.
Powered By Sangraha 9.0