भारतात आढळला दुर्मिळ वाघ!

रंग, आकार पाहून सारेच अचंबित

    दिनांक :04-Aug-2023
Total Views |
जगभरात होतेय् चर्चा
भुवनेश्वर,
rare tiger घनदाट जंगलात सफारी करताना अचानक दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन होते. अशातच वाघासारखा प्राणी समोर असेल तर, आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण, ओडिशाच्या सिमलिपाल नॅशनल पार्कमध्ये असाच एक आगळावेगळा दुर्मिळ वाघ दिसला आहे. या वाघाचा रंग आणि आकार पाहून अनेकांना घाम फुटला.
 
 
rare tiger
 
याआधी पिवळ्या किंवा तांबड्या रंगाचा वाघ जंगलात फिरताना पाहिला असेल, पण या जंगलात आढळलेला वाघ खतरनाक असून, तो विचित्र प्राण्यासारखा असल्याचे एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे. ओडिशाच्या जंगलात काळ्या रंगाचा दुर्मिळ वाघ rare tiger फिरत असल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले आहे. या वाघाला ‘मेलॅनिस्टिक टायगर’ असे म्हणतात. त्वचेवर गडद काळ्या रंगाच्या छटा आणि अंगावर केसांचे जाळे पिंजारलेला वाघ जगभरात लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल होताच यूजर्सही चक‘ावून गेले. कारण, अशा प्रकारचा वाघाचे क्वचितच कुणाला दर्शन झाले असेल. वाघाचा हा थरारक व्हिडीओ आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, ओडिशाच्या सिमलीपाल व्याघ‘ अभयारण्यात दुर्मिळ वाघाला कॅमेर्‍यात कैद केले आहे. काळ्या रंगाचे वाघ पाहण्यासाठी हे एकमेव ठिकाण आहे. भारतील महत्त्वाच्या अभयारण्यांपैकी सिमलिपाल हे एक आहे. बेंगाल टायगर्सही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. जंगल सफारी करताना वन विभागाचे अधिकारी वाघांच्या जवळ जाऊन जीव धोक्यात टाकू नका, अशा सूचना नेहमी देत असतात. त्यामुळे कोणत्याही अभयारण्यात वाघ पाहण्यसाठी गेले असता, लोकांनी सावधानता बाळगावी आणि वन विभागाचे नियम पाळावे, असे आवाहन केले जाते.