rice planting जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर रखडलेल्या भात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत लागवड क्षेत्राच्या सुमारे 86 टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी लागवड क्षेत्राच्या सुमारे 90 टक्के क्षेत्रावर भाताचे उत्पन्न घेतात. येथील जयश्रीराम, केशर हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्या गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे खरीप भात पीक रोवणीचे कामे अंतिम टप्प्यात आहे.
पारंपरिक तसेच सुधारित बियाणे अशा दोन्ही पिकांची शेतकर्यांनी लागवड केली आहे. जिल्ह्यात 2 लाख 20 हेक्टर क्षेत्र पीक लागवडीखाली येतो. पैकी 1 लाख 80 हजार 997 हेक्टरवर rice planting भाताची लागवड केली जाते. 6233.40 हेक्टर क्षेत्रावर आवत्या व 156152.60 हेक्टर क्षेत्रावर अशी 86.27 टक्के भात पिकाची रोवणी पूर्ण झाली आहे. 46.80 हक्टरमध्ये मका, 12.5 हक्टरवर इतर तृणधान्य, तूर 5245.20 हक्टरवर, मूग 115.38 हेक्टरवर, इतर कडधान्य 50.59 क्षेत्रावर, तीळ 713.35 हेक्टर क्षेत्रात, ऊस 294.10 हक्टरमध्ये, भाजीपाला 595.45 हेक्टरमध्ये, हळद 237.50 हेक्टर, आले 33.30 व इतर पीके 940.91 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या 163458.60 हेक्टर क्षेत्रात लागवड झाली असून टक्केवारी 86.47 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 627.6 मिमी म्हणजेच 104 टक्के पाऊस झाला आहे.