Annabhau Sathe साहित्या सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी 103 वी जयंती येथील लो. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, प्रेस क्लब दिग्रस व नगर परिषद कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आली.येथील प्रेस क्लब, लो. अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी व जयंतीसाठी पुढाकार घेत असतो. त्यात जयंती कार्यक्रमाला नगर परिषद कार्यालयाच्या सहभागाने दरवर्षी जयंती उत्सव साजरा करण्यात येतो.
या जयंतीला तहसीलदार अक्षय रासणे, सुधाकर राठोड, प्रेस क्लब अध्यक्ष रामदास पद्मावार, बबन इंगळे, ठाणेदार संजय सोळंके, सुधीर देशमुख, रवींद्र अरगडे, राजकुमार वानखडे, राहुल शिंदे, बाळू जाधव यांची उपस्थिती होती.छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोशनाईने सजावट करण्यात आली होती.Annabhau Satheउपस्थित तहसीलदार अक्षय रासणे, ठाणेदार संजय सोळंके यांनी प्रतिमेचे पूजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.या प्रसंगी विविध वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक व मातंग समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या सं‘येत उपस्थित होते.