कारंजा लाड,
Narendra Maharaj Sansthan आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा या वायप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी शय होतील त्या ठिकाणी रूग्ण सेवा कळत न कळत व्हावी, या हेतूने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणिज धाम जि. रत्नागिरी यांच्या वतीने महाराप्ट्रात ४२ अद्यावयत रूग्ण वाहीका अपघातग्रस्ताना मोफत सेवा देण्यासाठी देण्यात आल्यात त्या ४२ व्या रूग्णवाहिकेचा शूभारंभ कारंजा लाड येथे ५ ऑगस्ट रोजी अवर सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई चे अमोल पाटणकर यांच्या शूभहस्ते पार पडले. जिवनदायीनी म्हणुन रूग्णवाहिकेचा उपयोग करावा, असे मत अमोल पाटणकर यांनी व्यक्त केले.
कारंजा येथील महेश भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामार्ग पोलिस अधीक्षक नागपुरचे यशवत सोळंके तर प्रमुख अतिथी म्हणुन उपविभागी महसुल अधिकारी ललीत वर्हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे, ठाणेदार दिनेश शूला, शिरीश चवरे, कुंडलिक वायमासे, देवेंंद्र दलाल, सुरेश मोरे, माधवराव काळे, संजय संचेती, वनिता राठोड, गुरुमंदिर चे विश्वस्त निलेश घुडे, मंगेश कडेल यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती. Narendra Maharaj Sansthan योवळी प्रास्ताविक करतांना कुंडलिक वायमासे बोलतांना म्हणाले की, हया रूग्णवाहीकेचा उपयोग हा अपघात ग्रस्तासाठी होणार आहे. कारंजा शहरापासून ५० किलोमिटर पर्यंत अपघात झाल्यात त्या अपघाग्रस्तांना जवळच्या रूग्णालयात मोफत पोचविण्याचे काम या रूग्ण्वाहिकेव्दारे करण्यात येणार आहे. या करीत वाहन चालक किंवा कोणालाही एक रूपया सुध्दा देण्याची गरज नसून ही रूग्णवाहीका मोफत सेवा देणार आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. याकरीता ८७९९९१७३८८ या नंबर वर संपर्क साधवा, असे आवाहन पिठ प्रमुख वायभासे यांनी केले आहे. याप्रसंगी मान्यवराच्या हस्ते रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ज्योती वाणी व सजंय वाणी यांनी केले.