नागपूर,
rajesh chitnis 3 ऑगस्ट रोजी स्थानिक साई सभागृहात सचिन मोटे लिखित "एक डाव भटाचा" या दिलखुलास दोन अंकी विनोदी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर करण्यात आला. राजेश चिटणीस दरवर्षी या दरम्यान एक विनोदी नाटक हमखास रंगभूमीवर आणतात. त्यांच्या निर्मितीमध्ये 'सबकुछ राजेश' असाच तो प्रयोग असतो. rajesh chitnis विनोदी अभिनयाचा तो नागपुरातील बदशाहा आहे, असेच म्हणावे लागेल. विनोदी सादरीकरणासाठी आवश्यक असलेले टाइमिंग अचूक शब्दफेक, रंगमंचावरील त्याचा सहजपणे वावर आणि हावभाव, या सर्वांमुळे त्याने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. rajesh chitnis
नागपुरातील अनेक कलावंतांप्रमाणेच त्यानेही आपली जागा आज मुंबईतही निर्माण केली आहे. या सादरीकरणाचे श्रेय ज्याप्रमाणे राजेश चिटणीसांना जाते. rajesh chitnis त्याचप्रमाणे, सहकारी कलावंतांना देखील जाते, त्यातही सीमा गोडबोले, भावना चौधरी यांचे विशेष अभिनंदन! मुळात कथानक विनोदी, त्याला पूरक दिग्दर्शन, सांघिक अभिनय आणि आवश्यक ते परिणाम साधणारे अभिषेक बेल्लारवार यांचे संगीत या जमेच्या बाजू होत्या. rajesh chitnis नेपथ्यामध्येही सतीश काळबांडे यांनी विशेष परिश्रम घेतलेले जाणवले.
किशोर बत्तासे यांची आवश्यक अशी प्रकाश योजना तसेच श्याम आस्करकर, अनिल पाखोडे, ऐश्वर्या शिंदे आणि अविनाश पाटील या सर्वांनी राजेशला उत्तम सहकार्य केले. rajesh chitnis राजेश प्रमाणे काही कलावंतांनी जाणीवपूर्वक वाचिक अभिनयाकडे लक्ष दिल्यास सादरीकरणाची रंगत अधिक वाढेल. निर्माती राजेश्वरी चिटणीस, राजकला मंदिर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. rajesh chitnis प्रेक्षकांमध्ये राजेशचे वडील सुप्रसिद्ध नकलाकार राजाभाऊ चिटणीस यांची उपस्थिती लक्षणीय होती.
सौजन्य : संजय पेंडसे, संपर्क मित्र