जगदीशन बनले सर्वाधिक पगार घेणारे बँकर

07 Aug 2023 17:15:20
नवी दिल्ली,
देशातील सर्वांत मोठी खाजगी बँक एचडीएफसीचे एमडी (Shashidhar Jagadeesan) आणि सीईओ शशिधर जगदीशन हे आर्थिक वर्षात सर्वाधिक पगार घेणारे बँकर ठरले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांना एकूण 10.55 कोटी रुपये पगार देण्यात आला. वार्षिक अहवालानुसार, शशिधर जगदीशन यांचे सहकारी आणि एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक कैजाद भरुचा यांना गेल्या आर्थिक वर्षात 10 कोटी रुपये पगार दिला गेला. अशाप्रकारे ते देशातील सर्वांत जास्त पगार घेणारे दुसरे बँकर आहेत. जगदीशन यांच्या पगारात 10.55 कोटी रुपयांपैकी 2.82 कोटी रुपयांचे मूळ वेतन, 3.31 कोटी रुपयांचे भत्ते, 33.92 लाख रुपयांचे पीएफ आणि 3.63 कोटी रुपयांचे परफॉर्मन्स बोनस यांचा समावेश आहे.
 
Shashidhar Jagadeesan
 
जून तिमाहीच्या (Shashidhar Jagadeesan) निकालांमध्ये एचडीएफसी बँकेने 11,951.70 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला, जो वार्षिक आधारावर 30 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत नफ्याचा आकडा 9,196 कोटी रुपये होता. बँकेच्या सीईओच्या बाबतीत अ‍ॅक्सिस बँकेचे अमिताभ चौधरी पगारात 9.75 कोटी रुपयांसह दुसर्‍या क‘मांकावर आहेत. त्यांच्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे संदीप बक्षी यांना 9.60 कोटी रुपये पगार मिळाला.
उदय कोटक यांनी एक रुपया पगार घेतला
या सर्वांत कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ उदय कोटक (Shashidhar Jagadeesan) यांनी फक्त एक रुपया पगार घेतला आहे. उदय कोटक यांचा कोटक महिंद्रा बँकेत जवळपास 26 टक्के हिस्सा आहे. कोरोनानंतर मोबदला म्हणून त्यांनी 1 रुपये पगार घेण्याचा निर्णय घेतला होता.
Powered By Sangraha 9.0