पुसदच्या निषेध मोर्चात मुस्लिम आणि आदिवासी महिलांची मोठी उपस्थिती

    दिनांक :09-Aug-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
Adivasi मणिपूर राज्यातील महिलांची नग्न अवस्थेत काढलेली धिंड बलात्कार करून केलेली हत्येचे घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, समान नागरी कायदा आदिवासींचा पारंपरिक रूढी परंपरा व संवैधानिक हक्कांना मारक असल्यामुळे आदिवासींना हा कायदा लागू करण्यात येऊ नये, या मागणीसह विविध मागण्यांसाठी बुधवार, 9 ऑगस्ट रोजीच्या सकाळी 11 वाजता हजारोंच्या सं‘येने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.येथील बिरसा मुंडा चौकातून निघालेल्या मोर्चामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह समाजबांधव, महिलांसह मुस्लिम महिला देखील सहभागी होत्या. मोर्चा येथील महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी यांना अभिवादन करीत यशवंत रंगमंदिरात मोर्चाची सांगता करण्यात आली.
 
 
pusad morcha
 
 
या भव्य आक्रोश मोर्चामध्ये सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. भाजपाच्या मणिपूर राज्य व केंद्र सरकारने अशा नराधमांची पाठराखण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पीडित महिला आदिवासी समाजाच्या आहेत. परंतु या देशामध्ये महिलांशी सन्मानाने वागण्याची परंपरा असल्यामुळे कोणत्याही जातीतील महिलांवर अन्याय होता कामा नयेत, असे यावेळी सांगण्यात आले.
ही भयंकर घटना घडल्यानंतर राज्य व केंद्रातील भाजपा सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नाही. महिलेच्या नग्न धिंड घटनेनंतर संपूर्ण देशात संताप उफाळला आहे. अशा आरोपींना वेळीच फाशीची शिक्षा झाली नाही तर अशा गावगुंडांना बळ मिळेल आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होईल. त्यामुळे अशा मानसिकतेला जागीच ठेचण्याची गरज मोर्चातून व्यक्त केल्या गेली.Adivasi
या भव्य मोर्चासाठी आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष माधव वैद्य, कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुनील ढाले, उपाध्यक्ष सुरेश धनवे, सचिव नारायण कराळे, सदस्य ज्ञानेश्वर तडसे, रंगराव काळे, अ‍ॅड. रामदास भडंगे, फकिरा जुमनाके, पांडुरंग व्यवहारे, मराठा सेवा संघाचे सुधीर देशमुख, प्रदेश काँग‘ेसचे महासचिव डॉ. मोहंमद नदीम, भीम-टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, बीआरएसचे शीलानंद कांबळे, गजानन उघडे, गणपत गव्हाळे, हरिदास बोके, राजू तडसे, गजानन टारफे, सुदाम चिरंगे, संतोष गारूळे, नामदेव इंगळे, गजानन टाले, समाधान बळी, तहसिन पहेलवान, विजय बाबर, अजय पुरोहित, गजानन टारफे, अ‍ॅड. संदीप कोठुळे, लक्ष्मण पांडे, शिवाजी तोरकड, सुनीता मळघने, मीना व्यवहारे, सीता सरकुंडे, मनीषा बेले, उपा टारफे, आशा पांडे, वर्षा वैधे, शितल ढगे, पूजा कुडे, सुनंदा ठाकरे, अ‍ॅड. रहेमत अली, डॉ. पठाडे, जुमनाके, भारत कांबळे, मारोती भस्मे यांच्यासह अनेक मान्यवर मोर्चात सहभागी होते.