उदयनगर चौकात रिंग रोडवर जीवघेणा खड्डा

09 Aug 2023 13:18:02
नागपूर,
 
Uday Nagar Nagpur पावसामुळे नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली. दक्षिण नागपुरातील उदय नगर चौक, रिंग रोडवर मोठा खड्डा पडलेला आहे.  या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
 
 
Uday Nagar Nagpur
 
Uday Nagar Nagpur संबंधित विभागाने व जनप्रतिनिधींनी याकडे जातीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी विशाल कोरके, किशोर धोटे, अभिषेक देशमुख, शैलेंद्र आंबिलकर, विनोद चकोर, कार्तिक नारनवरे, किरण शेळके, आशिष भोयर, प्रशांत क्षीरसागर, निलेश डहाके, रोहन तरवटकर, अथर्व कलोडे आदी या भागातील नागरिकांनी केली आहे. Uday Nagar Nagpur
 
सौजन्य : डॉ. दीपक शेंडेकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0