इस्रोचे माजी प्रमुख डॉ के सिवन यांना नवी जवाबदारी

    दिनांक :01-Sep-2023
Total Views |
इंदूर, 
Dr K Sivan प्रख्यात अंतराळ शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के सिवन यांची तीन वर्षांसाठी आयआयटी इंदूरच्या गव्हर्नर मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, "डॉ. के. सिवन, माजी अध्यक्ष, इस्रो आणि माजी सचिव, अंतराळ विभाग, यांना IIT इंदूरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून सन्मानित केले आहे," संस्थेने ट्विटवर ही माहिती दिली आहे.   

Dr K Sivan
 
IIT इंदूरचे संचालक, सुहास एस जोशी म्हणाले की,  "चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण करून भारताने ऐतिहासिक कामगिरी केली Dr K Sivan  आणि अंतराळ अभियांत्रिकीमध्ये आपले पराक्रम आणि कौशल्य सिद्ध केले तेव्हा त्याना IIT इंदूर कुटुंबात समाविष्ट करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही,"