नागपूर,
Abhinandan High School वंदना शिक्षण संस्थेद्वारा संचालित अभिनंदन प्राथमिक व हायस्कूल बापू नगर, या शाळेत कृष्ण जन्माषटमी निमित्त दहीहांडी व गोपालकाला घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव रमेश वंजारी शाळेच्या मुख्याध्यापिका फालक उपस्थित होत्या. या कार्यक्रमांमध्ये शाळेचे विद्यार्थी कृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत उपस्थित होते. देवकीनंदन मीना व मानसी राठोड यांनी कृष्ण व राधाची भूमिका केली होती. विद्यार्थिनीनी गरबा, दांडिया नृत्य सादर केले. दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी भाग घेतला.विद्यार्थ्यांनी स्वतः गोपाळकाला तयार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्य भोंगाडे, बघेल, ढवळे,आसरे, आस्टनकर, ढोले, सोनवाणे ,श्याम देशमुख यांनी संपूर्ण सहभाग दिला. रमेश वंजारी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. गोपाळकाला वितरण होऊन कार्यक्रम खूप उत्साहात साजरा करण्यात आला.
सौजन्य :दिपक रेवतकर संपर्क मित्र