तभा वृत्तसेवा
यवतमळ,
Abhyankar Girls School अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ येथे गुरुवारी खाजगी, नगर परिषद व अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षकांचे एक दिवशीय शिक्षण परिषद तथा स्वच्छता मॉनिटर अभियानांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्यंकर कन्या शाळेच्या मुख्याध्यापक मोहना गंगमवार यांची उपस्थिती होती. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नप 3 चे केंद्रप्रमुख राजेंद्र मेनकुदळे, जिल्हा समन्वयक शुभांगी वानखडे, साधनव्यक्ती दीपलक्ष्मी ठाकरे, प्रिती ओरके यांची उपस्थिती होती.

उपस्थितांनी सरस्वती यांच्या प्रतिमेला मार्ल्यापन करून शिक्षण परिषदेचा प्रारंभ केला. यावेळी भूमिका महल्ले, ईश्वरी ठाकरे यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजेंद्र मेनकुदळे यांनी केले.या शिक्षण परिषदेत तासिका निहाय विद्या प्रवेश या बाबत दीपलक्ष्मी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. Abhyankar Girls School तसेच अनिता खोरगडे यांनी नवोपक‘म याबाबत माहिती दिली. लेट्स चेंज अभियाना अंतर्गत शुभांगी वानखडे यांनी स्वच्छता मॉनिटर म्हणून विद्यार्थ्यांची भूमिका कशी असावी व हा उपक्रम कसा राबवावा याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक मोहना गंगमवार तसेच राजेंद्र मेनकुदळे यांनी समायोचित विचार व्यक्त केले.या शिक्षण परिषदेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिक्षण परिषदेत बहुसंख्येने खाजगी, नगर परिषद अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. लेट्स चेंज मॉनिटर अभियान व शिक्षण परिषद ही शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या नियंत्रणात व मार्गदर्शनात घेण्यात आली.कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक राहूल कोचे तथा अभ्यंकर कन्या शाळेचे शिक्षक, कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन दिनेश घुगे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत कचरे यांनी मानले.