बैलपोळा निमित्त आयोजित बैल जोडी सजावट स्पर्धा

12 Sep 2023 15:44:24
शिरपूर जैन,
Bullock Pola येथील महात्मा फुले नवयुवक मंडळ यांच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी बैलपोळा सणाच्या निमित्ताने बैल जोडी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तेव्हा सर्व शेतकरी बांधवांनी आपली बैल जोडी सजवून पोळ्या मध्ये आणावी.शिरपूर येथे शेकडो वर्षापासून दोन बैलपोळा भरण्याची परंपरा असून ही परंपरा आज रोजी सुरूच आहे.
 
 
Bail Pola
 
एक पोळा पोलीस स्टेशन समोर भरविण्यात येतो तर दुसरा पोळा आठवडी बाजार आई भवानी संस्थान जवळ भरण्यात येतो यावर्षी प्रथमच आठवडी बाजार बैलपोळा मध्ये महात्मा फुले मंडळाच्या वतीने बैल जोडी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये शक्यतो तर बैल जोडी एक शिंगी एक रंगी असावी बैल चांगले सजवून आणावे, बैल जोडी सोबत पुरानी किंवा काठी बाळगु नये, बैल जोडी गावातीलच असावी, यावर बैल जोडीला गुण देऊन ईनाम देण्यात येईल याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.Bullock Pola पहिला ईनाम ३१०० रुपये गणेश ईरतकर, दुसरा २५०० रुपये आकाश चोपडे व कैलास भांदुर्गे, तिसरा २१०० रुपये अमोल अजगर, चौथा १५०० रुपये मंगल अढागळे व उत्तम अढागळे, पाचवा ११०० रुपये प्रल्हाद उल्हामाले, सहावा ११०० रुपये अक्षय आहेर, सातवा ७०० रुपये राजेश्वर शेंडे, आठवा ५०० रुपये अरुण उल्हामाले यांचे तर्फे ठेवण्यात आले असुन या स्पर्धेचे बक्षीस वितरण लगेच पोळा सुटण्या आधी करण्यात येईल याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे महात्मा फुले नवयुवक मंडळ यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0