जंगलातील अनेक वृक्ष पडताहेत उन्मळून

    दिनांक :12-Sep-2023
Total Views |
- अति पावसाचा परिणाम की रोगाचा प्रादुर्भाव

मारेगाव,
मार्डी परिसरातील फिस्कीच्या Trees falling जंगलातील झाडे उन्मळून पडत आहे. हे सर्व अति पावसाने होत आहे की, कोण्या रोगाचा प्रादुर्भाव आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. परंतु याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मारेगाव तालुक्यात अनेक जंगले आहेत. त्यापैकी मार्डी परिसरात कानडा, हिवरा, फिस्की आणि दापोरा अशी जंगले आहे. यापैकी फिस्कीचे जंगल मोठे आहे. या जंगलाचा परिसरही मोठा असून येथे हिंस्त्र वन्य पशूंचा वावर असतो.
 
 
Jangal
 
याच फिस्कीच्या Trees falling जंगलामधून मार्डी-वणी हा रस्ताही जातो. या रस्त्याच्या बाजूलाच जंगलातील काही झाडे उन्मळून पडलेली आढळून येत आहे. यातील काही झाडे तर मुळापासूनच उन्मळून पडलेली आहेत. तर काही झाडांच्या फांद्या तुटून पडलेल्या आहेत. मात्र, अती पावसाने ही झाडे उन्मळून पडली की, कोण्या रोगामुळे हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. रस्त्याच्या बाजूसोबतच आतमध्येही काही झाडे उन्मळून पडलेली दिसून येत आहेत.
 
 
Trees falling एकीकडे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. वातावरण असंतुलित होत आहे. यावेळी वृक्ष लागवड आवश्यक असते. वृक्ष लागवड अत्यंत मंदगतीने सुरू असून याचा परिणामी अती पाऊस, ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ असा दिसतो. अशातच जंगलातील सागवान झाडांचे उन्मळून पडणे हे चिंतेत भर घालणारे आहे. यावर वनविभागाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून मागणी होत आहे.