जगाचा पोशिंदा !

bail pola-farmers सुखी शेतकरी तर देशाची प्रगती

    दिनांक :12-Sep-2023
Total Views |
प्रासंगिक
- हिमगौरी देशपांडे
bail pola-farmersआपल्या मातृभूमीसाठी अन्नधान्य पिकवणारा, धरतीला सुजलाम् सुफलाम् बनवणारा बळीराजा रात्रंदिवस शेतात राबत असतो. आपला भारत कृषिप्रधान देश आहे. ‘जय जवान जय किसान' लालबहादूर शास्त्रींनी केलेले प्रतिपादन खऱ्या अर्थाने भारताचं श्रेष्ठत्व जगासमोर उभं करतं. bail pola-farmers परंतु, दुर्दैवाने शेतकऱ्यांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. शेतकरी एक अशी व्यक्ती आहे, जी आपल्या कष्टाने, मेहनतीने आपल्या देशात राबते. शेतकऱ्याला सर्वजण आदराने जगाचा पोशिंदा म्हणून चालणार नाही तर आपल्या एकंदरीत कृतीतून शेतकऱ्यांसाठीच आपला आदर परावर्तित करणे गरज आहे. शेतकरी कोणत्याही कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा आहे. bail pola-farmers जगाच्या पाठीवर फक्त भारत देश आणि भारत देशातली जास्तीत जास्त लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. प्रत्येक शेतकऱ्याची मुख्य मालमत्ता, त्याचे भांडवल म्हणजे त्याची जमीन. bail pola-farmers मालकीची शेतजमीन असली तरी शेतक-याला तिचा भांडवल म्हणून उपयोग करता येत नाही. आज परिस्थिती अशी आहे की, शेती करणे त्याला लाभदायक तर सोडा; परवडतही नाही. bail pola-farmers कर्जमाफीसारख्या योजना आणून शेतकऱ्यांचे सरकारवरचे अवलंबित्व वाढवणं किंवा सरकारी योजनांना राजकीय स्वरूप देऊन चर्चा रंगवून हा काही त्यावरचा योग्य पर्याय नाही.
 
 

bailpola 
 
 
आधीच बेभरवशाच्या नैसर्गिक परिस्थितीला तोंड देताना शेतकरी जेरीला येतो. bail pola-farmers शेतकरी दुष्काळाचा सामना करत असो वा कर्जाच्या विळख्यात अडकलेला असो, यावर कधीतरी भाज्यांचे, फळांचे दर वाढले की आपल्यासारखेच लोक बोंबा मारत फिरतात. मला एक कळत नाही, फ्लॅटच्या किमती वाढल्या, सोन्याच्या किमती वाढल्या, गाड्यांच्या किमती वाढल्या तर आपण या सगळ्या गोष्टींचा एवढा ऊहापोह करतो का? मुक्याने आहे ती परिस्थिती स्वीकारतो आणि आपली गरज म्हणून त्या वस्तू विकत घेतो. bail pola-farmers मग नेमकं धान्यांच्या आणि फळांच्या वेळेलाच आपल्याला कसा काय कंठ फुटतो? शेतकरी कधीही संप करत नाही. त्याच्या अगदी क्षुल्लक मागण्यांसाठीसुद्धा तो मोठमोठाले आंदोलन करत नाही. मुळात हा ललित लेख नाही तरीसुद्धा सांगावसं वाटतं की, ही आपली संकुचित मानसिकता या सगळ्याचं मूळ आहे. bail pola-farmers एकाच कुटुंबातील माणसं मोठ्या शहरांमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी या जमिनी विकून भरमसाट किमतीमध्ये नवा कोरा फ्लॅट शहरांमध्ये विकत घेतात. उर्वरित पैशांची तगडी एफ.डी. काढतात. मात्र, जी व्यक्ती तुमची जमीन सांभाळून ठेवते, तिच्यावर मिळणाऱ्या उत्पादनातून समाजाचा पोट भरण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करते त्याची किंमत मात्र शून्य असते.
 
 
bail pola-farmers जर हवामानात अचानक बदल झाला, तर शेतातील पिकांचे खूप नुकसान होते. परिणामी शेतात घेतलेली मेहनत आणि हजारो रुपये खर्च करून तयार झालेला शेतमाल वाया जातो. ऊन, पाऊस, थंडी, वादळी, वारा अशा समस्यांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा शेतकरी सर्वांना लागणारे अन्नधान्य पिकवतो. कृषी विद्यापीठ आणि शासनाने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना तयार केल्यानंतर त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणंसुद्धा तितकंच गरजेचे आहे. bail pola-farmers आद्य शेतकऱ्यांचा काळ म्हणून नवाश्म युगाला ओळखले जाते. ट्रॅडिशनल लूक म्हणून खाली धोतर आणि कोल्हापुरी चपला घातल्या जातात, शिवलेली नऊवारी पातळं नेसली जातात. विचार करा, एक दिवस असा ट्रॅडिशनल लूक धारण केल्यावर आपण इतके उठून दिसतो. शेतकरी दाम्पत्य हा असा वेश-पोशाख आयुष्यभर परिधान करतात. मग त्यांची प्रतिष्ठा किती उच्च असेल! bail pola-farmers म्हणतात ना माणसांची ओळख त्यांच्या कपड्याने नाही तर त्यांच्या कर्तृत्वाने होते, हे यातून सिद्ध होतं. आपल्या देशामध्ये विविध दिन साजरे करण्याची परंपरा आहे.
 
 
तसाच आपल्या शेतकऱ्यांचा लाडका दिवस, लाडका सण म्हणजे बैलपोळा. bail pola-farmers शेतकऱ्यांचा सखा-सोबती प्रत्येक सुख-दुःखात सहभागी असणाऱ्या धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. कितीही प्रगत तंत्रज्ञान आले तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बैलांनी शेतकऱ्याची साथ कधीच सोडलेली नाही. श्रावणातील प्रत्येक व्रत-वैकल्य, सण-उत्सव यांना धार्मिक महत्त्व आहे. bail pola-farmers शास्त्रीय, व्यावहारिक, नैसर्गिक या दृष्टीने भारतीय सणांना एक स्वतःची स्वतंत्र बाजू आहे. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो. ‘आज आवतन घ्या, उद्या जेवायला या' असं आमंत्रण बैलांना दिलं जातं. ही पद्धतच आहे. कृषिप्रधान संस्कृतीतील मुख्य घटक असलेल्या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस किंवा सण म्हणजेच बैलपोळा. bail pola-farmers शेतकऱ्यांचं प्रत्येक कुटुंब सुखी, समाधानी आणि आनंदी राहिले तर देशही अधिक समृद्ध होऊन प्रगतीकडे वेगाने वाटचाल करेल.
९८६०२९१८६५