बेलतरोडीत तान्हा पोळा उत्सव

12 Sep 2023 20:33:17
नागपूर,
 
beltarodi-nagpur स्थानिक बेलतरोडी येथे १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता भव्य तान्हापोळा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. beltarodi-nagpur  पोळा उत्सवासाठी उद्घाटक म्हणून खा. कृपाल तुमाने तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे आणि बेसा-पिपळा नगर पंचायतचे प्रशासक भारत नंदनवार उपस्थित राहणार आहेत. beltarodi-nagpur या उत्सवाचे यंदाचे हे १४ वे वर्ष असून उत्कृष्ट नंदी सजावट, उत्कृष्ट वेशभूषा, उत्तम संदेश याकरिता बक्षिसांची रेलचेल असणार आहे. beltarodi-nagpur या उत्सवात मोठ्या प्रमाणात बालगोपालांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक जितेंद्र चांदुरकर आणि गोपाल मसादे यांनी केले आहे.
 
 
beltarodi-nagpur
 
सौजन्य : आदित्य देशकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0