वेध
- गिरीश शेरेकर
child criminals अमरावतीत क्षुल्लक कारणावरून चार दिवसांपूर्वी एका २२ वर्षीय तरुणाची हत्या झाली. त्यात चार अल्पवयीनांचा सहभाग असल्याचे समोर आले. सराईत गुन्हेगाराने करावे असे हे हत्याकांड आहे. child criminals कोणत्याही कारणावरून वादावादी होण्याचे प्रकार नवीन नसले, तरी अशा संघर्षामध्ये एखाद्याचा बळी जाणे आणि त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असणे हे खूपच चिंताजनक आहे. हे एक उदाहरण आहे. child criminals राज्यातल्या अन्य शहरांमध्येही कमी-अधिक प्रमाणात बालगुन्हेगारांचा सहभाग असलेले वेगवेगळे गुन्हे दररोज नोंदविले जातात. हे प्रमाण दिवसागणीक वाढत असून शहरी भागात ते जास्त आहे. मुलांकडे झालेले दुर्लक्ष व त्यातून पालक-मुलांमध्ये कमी झालेला संवाद आणि बदलणारी सामाजिक , आर्थिक परिस्थिती हे त्या पाठीमागचे एक कारण आहे.child criminals हत्या, बलात्कार, अपहरण, दुचाकी चोरी, घरफोडी, दंगली, देशी कट्ट्यांची वाहतूक यासारखे गंभीर गुन्हे बालकांच्या हातून घडत आहेत.
child criminals पूर्वी केवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये असणारे हे पेव आता तुलनेने छोट्या पण राज्यातल्या नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक अशा प्रमुख शहरांमध्ये पसरत आहे. यासाठी संबंधित बालकांचे पालक दोषी आहेतच; पण समाज आणि सरकारला आपले हात झटकता येणार नाही. child criminals एका उपलब्ध आकडेवारीनुसार, अमरावतीत गेल्या आठ महिन्यांमध्ये ५४ बाल गुन्हेगारांची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर शहरात हे प्रमाण जास्त आहे. अन्य शहरांमध्ये ते तुलनेने कमी आहे. कोणताही बालगुन्हेगार हा गरीब घरचा अथवा अशिक्षित, खेड्यातील आहे, असा समज चुकीचा आहे. child criminals मोबाईल चोरणे, ते कमी किमतीत विकणे, पेट्रोल चोरून ते चोरीच्या गाडीत टाकून फिरणे, घरफोडी, सायबर गुन्हे यात १६ ते १८ वयोगटातील सुशिक्षित व उच्चभ्रू घरातील शहरी मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. चित्रपट, वेब सीरिज, समाज माध्यमांतून येणाऱ्या आक्षेपार्ह चित्रफिती व मजकुराचा मोठा प्रभाव मुलांवर पडतो आहे.
मोटारसायकलवर बसून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे, ते विकून चैन करणे अशी नवी संस्कृती प्रत्येक शहरात फोफावल्याचे दिसते. child criminals आता तर देशी कट्टे विकण्याच्या धंद्यातही बालगुन्हेगारांचा सहभाग दिसतो आहे. कायद्यातली पळवाट शोधून सराईत गुन्हेगार आपली कामे मार्गी लावण्यासाठी बालगुन्हेगार तयार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. अशा बालगुन्हेगारांच्या गरजा पूर्ण करून त्यांना वेगवेगळी आमिषे दाखविली जातात. child criminals एखाद्या प्रकरणात पोलिसांच्या हाती सापडला तरी लवकरच बाहेर येण्याची हमी असल्याने अनेक मुले या दलदलीत फसली आहेत. यातीलच काही मुले पुढे सराईत गुन्हेगार होतात. जवळपास सर्वच शहरांमध्ये हा प्रकार सुरू आहे. त्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. child criminals मध्यप्रदेश व महाराष्ट्रात बालगुन्हेगारांची संख्या जास्त असल्याचे सांगितले जात असले, तरी त्या पाठीमागचे मुख्य कारण या दोन्ही राज्यात प्रत्येक गुन्ह्याची होणारी नोंद आहे. तुलनेने इतर राज्यात म्हणजे उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये गुन्हे घडतात, पण नोंदीचेच प्रमाण कमी असल्याने गुन्ह्यांची संख्या कमी दिसते. सांगायचा मुद्दा इतकाच की, बालगुन्हेगारी संपूर्ण देशातच फोफावत आहे. मुलांमध्ये चंगळवादी, भोगवादी जीवनशैली रुळत असल्याने गुन्हेगारी कृत्य करून पैसे कमविण्याचे प्रमाण वाढत आहे.
शहरी जीवनाचे आकर्षण किशोरवयीन तरुणांना स्वस्थ बसू देत नाही. भन्नाट इच्छापूर्तीसाठी तरुण काहीही करायला तयार आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजनांची नितांत गरज आहे. child criminals १८ वर्षांखालील आरोपींना विधिसंघर्षग्रस्त बालके म्हटले जाते. त्यांच्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष न्यायालय असते. त्याला बाल न्यायमंडळ म्हणतात. त्यांना पालकांच्या देखरेखीखाली qकवा सुधारगृहात पाठवले जाते. हे वय १६ वर्ष करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. मुलांची बुद्धिमत्ता पूर्वीसारखी राहिलेली नाही. child criminals त्यातून वेगवेगळे गैरप्रकार त्यांच्या हातून घडतात. कायद्याचा आधार घेऊन गंभीर गुन्हा करणारे बालगुन्हेगार सुटल्याची अनेक उदाहरणे आहे. निर्भया प्रकरणातला एक आरोपी त्याच प्रकारातला आहे. गंभीर गुन्ह्यात सहभाग असणाèया बालगुन्हेगारांची सर्वाधिक संख्या १६ ते १८ वर्षांपर्यंतचीच आहे. कायद्यानेच जर वय १६ वर्ष केले तर गंभीर गुन्ह्यातल्या गुन्हेगारांना योग्य शिक्षा होऊ शकेल. त्याचा धाकही निर्माण होईल. समाज, पालक आणि सरकार या तिघांनीही या सामाजिक समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
९४२०७२१२२५