कर्नल, मेजर, पोलिस अधीक्षक हुतात्मा

अनंतनागमध्ये सुरक्षा दल-अतिरेक्यांत भीषण चकमक

    दिनांक :13-Sep-2023
Total Views |
श्रीनगर, 
Anantnag terrible flicker : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग हलुरा गंडूल परिसरात बुधवारी भीषण चकमक झडली. अतिरेक्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग कर्नल, मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक हुतात्मा झाले. कर्नल मनप्रीतसिंग, मेजर आशिष आणि पोलिस अधीक्षक हुमायूं भट गोळीबारात गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. भट यांचा मृत्यू अत्याधिक रक्तस्रावामुळे झाला, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
fsdfv
 
परिसरात अतिरेकी असल्याची माहिती मिळताच लष्कर (Anantnag terrible flicker) आणि पोलिसांच्या संयुक्त पथखाने कोकरनागमधील हलुरा गंडूल परिसराला वेढा दिला आणि शोधमोहीम राबवली. सुरक्षा दलाने वेढा आवळल्याचे लक्षात येताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. यात लष्कराचे दोन आणि पोलिसांचा एक वरिष्ठ अधिकारी जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
 
राजौरीत दोन अतिरेक्यांचा खात्मा
यापूर्वी जम्मूतील राजौरी जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत दोन (Anantnag terrible flicker) अतिरेक्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केला. यातील एका अतिरेक्याला सुरक्षा दलाने सुरुवातीलाच टिपले होते. दुसर्‍या अतिरेक्याचा बुधवारी खात्मा करण्यात आला, असे जम्मूचे पोलिस महानिरीक्षक मुकेशसिंह यांनी सांगितले.
 
fsdfv
 
लष्कराचे श्वानही हुतात्मा
राजौरी येथे झालेल्या (Anantnag terrible flicker) चकमकीत एका जवानाचे प्राण वाचवताना लष्कराच्या केंट हा श्वान हुतात्मा झाला. यापूर्वी त्याने नऊ कारवायांमध्ये भाग घेतला होता. पळ काढणार्‍या अतिरेक्यांचा पाठलाग केंट करीत होता.