दामिनी पथक व भरोसा सेलची जनजागृती

    दिनांक :13-Sep-2023
Total Views |
सडक अर्जुनी, 
Public awareness पोलिस विभागाच्या वतीने स्थानिक जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 11 सप्टेंबर रोजी कायदेविषयक विविध बाबींवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. पी. डोंगरवार होते. यावेळी डुग्गीपारचे पोलिस निरीक्षक आर. के. सिंगनजुडे, गोंदियाचे पोलिस निरीक्षक वाय. एस. चाफले, पोलिस उपनिरीक्षक पूजा जाधव, दामिनी पथकाचे कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
Public awareness
 
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रजलनाने करण्यात आली. प्रसंगी वाय. एस. चाफले यांनी कठीण प्रसंगातही हातून गुन्हा घडू नये यासंदर्भात मार्गदर्शन करुन गुन्ह्याचा जीवनावर होणार्‍या परिणामाबद्दल माहिती दिली. Public awareness राजेंद्र अंबादे यांनी पोस्को कायदा व शिक्षेचे स्वरूप याची माहिती दिली. मुख्याध्यापक डोंगरवार यांनी कायदा व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. दरम्यान गोंदिया बॉईजच्या सदस्यांनी पथनाट्य सादर केले. संचालन करून आभार एन. आर. गिर्‍हेपुंजे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.