समाजमनाची उदारता !

Sanatana-corona-stalin पुनर्विचार करण्याची वेळ

    दिनांक :13-Sep-2023
Total Views |
इतस्तत:
- डॉ. विवेक राजे
Sanatana-corona-stalin तामिळनाडू सरकारमध्ये मंत्री असलेले आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी, ‘सनातन हिंदू धर्म म्हणजे कोरोना, मलेरियासारखा रोग आहे आणि तो आपल्याला संपवलाच पाहिजे,' अशा अर्थाचे एक विधान केले होते. प्रसिद्धी माध्यमांमधून सध्या त्यावर गदारोळ उठला आहे. Sanatana-corona-stalin अनेक पातळ्यांवर त्याची दखल घेतली गेली. एखाद्या ख्रिश्चन किंवा मुस्लिम माणसाकडून हिंदू धर्माच्या विरोधात केले गेलेले हे पहिलेच विधान नाही. या आधीदेखील अनेकदा, अनेक लोकांनी अशी विधाने केलेली आहेत. अशा प्रकारच्या एखाद्या विधानाकडे कितपत लक्ष द्यावे, हा जरी प्रश्न असला आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणे सहज शक्य असले, तरी त्या मागची भावना मात्र नक्कीच दुर्लक्ष करण्याजोगी नाही. Sanatana-corona-stalin एकेश्वरवादी धर्म, म्हणजे अर्थातच मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांचा हा दृष्टिकोन खूप आधीपासून म्हणजे हे दोन्ही धर्म आपल्या धर्मांचा प्रसार करीत या भारतवर्षावर येण्यात यशस्वी झाले, तेव्हापासूनचा आहे. येथे भारतवर्ष हा शब्द वापरण्याचे कारण आजच्या भारतीय प्रादेशिक सीमांच्या पलीकडे (अगदी अखंड भारताच्या आजच्या सीमांच्यादेखील पलीकडे) कधीकाळी सनातन हिंदू धर्माचे अस्तित्व होते, हे लक्षात आणून देणे हेच आहे. Sanatana-corona-stalin
 
 
Sanatana-corona-stalin
 
एका बाजूला इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचा अहंकार व असहिष्णूता तर दुसरीकडे सनातन हिंदू धर्माची उदारतेची, सन्मानाची आणि सहिष्णुतेची शिकवण आहे. एकेश्वरवादी धर्म एकच पुस्तक आणि एकच मार्ग किंवा पद्धती इतरांवर थोपवू इच्छितात. तर, सनातन हिंदू धर्म मात्र अनेक पद्धती, अनेक मार्ग, अनेकांगी तत्त्वज्ञान यांचा अंगीकार करणारा आहे. Sanatana-corona-stalin या उदारतेचा परिणाम अर्थातच या धर्मसमुदायाच्या मानसिकतेवर झालेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आधुनिक काळात ‘सेक्युलर' ठरवण्याचा लिब्रांडूंकडून प्रयत्न होताना दिसतो आणि बहुसंख्य लोक त्यावर मूग गिळून गप्प बसतात. त्यामुळे आज यावर समस्त हिंदू समाजाने वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. आम्ही सहिष्णू आहोत, पण आमच्या धर्मासंबंधी वेडेवाकडे शब्द सहन केले जाणार नाहीत, हे सांगायची वेळ आलेली आहे. Sanatana-corona-stalin सहनशीलता आणि सहिष्णुता यात मुळात अंतर आहे. सहिष्णुतेत सर्व प्राणिमात्रांचे अस्तित्व महत्त्वपूर्ण आणि निर्णायक मानले गेले आहे. सहनशीलतेचा उगमच मुळात दुबळेपणातून झालेला असतो. जोपर्यंत इतर धर्मीय आपल्या धर्मश्रद्धांचे पालन करीत असतात तोपर्यंत सहिष्णू वृत्ती योग्य असते.
 
 
पण जेव्हा हेच इतर धर्मीय आपल्या धर्मश्रद्धांवर हल्ला करतात, आपल्या धर्माला उखडून टाकण्याची इच्छा करतात, तशी भाषा करतात आणि तरीही जर एखादा समाज शांत राहतो तर ती सहनशीलता म्हणावी लागेल. इथे हिंदू समाजाला आपला पारंपरिक पवित्रा सोडून देण्याची गरज निर्माण झाली आहे. पारंपरिक पवित्रा म्हणजे अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणे. कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या धर्मश्रद्धांचे पालन करणे, दोन समाजांमधील सौहार्द कायम ठेवणे इत्यादी. Sanatana-corona-stalin बदलत्या काळानुसार आज हिंदू समाजाने अधिक जागृत होऊन या प्रवृत्तींच्या विरोधात पवित्रा घेतला पाहिजे. आजच्या काळात हिंदू समाजाने अशा घटनांच्या विरोधात उच्चरवात व्यक्त होणे आवश्यक आहे. समाजाच्या सर्व स्तरांवरून अशा वल्गना करणाऱ्यांचा निषेध नोंदविला जाणे हा याचा एक भाग झाला. आज अशा लोकांना जाहीर आव्हान दिले जाणे गरजेचे आहे. आता हिंदूंनी इतर धर्मांतील दोष-उणिवांवर तार्किक हल्ला केलाच पाहिजे. अंधश्रद्धा, दोष, अतार्किक प्रथा, परंपरा, अपप्रवृत्ती इ. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मात मोठ्या प्रमाणावर आहेत. Sanatana-corona-stalin इतर धर्मीय जर हिंदू धर्माची, आमच्या देवतांची निंदा करतील तर हिंदूदेखील इतर धर्मांमधील दोष, उणिवा तेवढ्याच आक्रमकपणे समोर आणतील, हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.
 
 
याकरिता फक्त आपल्या हिंदू धर्माचा, हिंदू संस्कृतीचा आणि सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास पुरेसा नसतो, तर इतर धर्मांचाही अभ्यास आवश्यक असतो. दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे आमच्या धर्मश्रद्धांना समाजातील प्रत्येक माणसाने आपल्यापरीने उजागर करण्याचा प्रयत्न करणे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलनात पक्षीय मतभेदांमुळे अनेक हिंदू सहभागी होणे टाळताना दिसले. Sanatana-corona-stalin  राम मंदिर उभारणी ही सर्व हिंदू समाजाच्या अग्रक्रमाचा विषय होता आणि आहे. पण अनेक जण राम मंदिर उभारणी हे संघ आणि भाजपा यांचाच जणू विषय आहे, असे दाखवत होते. आज पुन्हा एकदा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशी मंडळी राम मंदिर उभारणीचे स्वागत करताना दिसतात. पक्षीय मतभेद आणि पक्षीय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन हिंदूंनी आज विचार केला पाहिजे. असा विचार हिंदू आजही करू शकत नाही, हे दुर्दैवी आहे. राजकीय पक्षांनी आम्हाला जातिपातींमध्ये विभागून ठेवले आहे. इतर धर्मीयांच्या एकगठ्ठा मतांसाठी एरवी धर्माभिमान दाखवणारे नेते अशा वेळी गप्प बसलेले दिसतात. पक्षीय मतभेद, पक्षीय स्वार्थ, जातीय अस्मिता या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन हिंदू समाजाने आज कृती करण्याची गरज आहे.
 
 
आम्ही आमचे उत्सव साजरे करतो. घरोघरी विविध धार्मिक विधी करतो; पण आज तेवढे पुरेसे नाही. आमच्या अवतीभवती असलेल्या आणि सोयीस्कर मौन बाळगणाऱ्या सर्वांपर्यंत या विषयावर आपल्या सुस्पष्ट भावना पोहोचविणे आवश्यक आहे. या भावना शब्दांनी त्यांच्याशी संवाद साधून पोहोचविल्याच पाहिजेत. त्याच वेळी प्रत्येक हिंदू माणसाने दर आठवड्याला एखाद्या मंदिराला सहकुटुंब भेट दिली पाहिजे. Sanatana-corona-stalin ही भेट त्या मंदिरातील आरतीचे वेळी देऊन आम्ही इतरांना अधिक चपखल उत्तर देऊ शकतो, हे निश्चित. सर्व हिंदू स्त्री-पुरुषांनी कपाळावर गंध-टिळा लावणे सुरू केले पाहिजे. आम्ही हिंदू आहोत आणि या सनातन हिंदू धर्मावर आमच्या अतूट श्रद्धा दाखविण्याचा हा एक सहज मार्ग आहे. हिंदूंनी आपले सगळे सण-उत्सव पूर्ण उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले पाहिजेत. सार्वजनिक गणेशोत्सव असो वा दुर्गा पूजा असो; इथून पुढे प्रत्येक हिंदू माणसाने आपला सहभाग नोंदविला पाहिजे. Sanatana-corona-stalin येणाऱ्या गणेशोत्सवात इस्लामिक आक्रमण, ख्रिश्चनांनी हिंदूंवर केलेले अत्याचार, श्रीराम आणि श्रीकृष्ण चरित्र, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशव्यांचे युद्ध कौशल्य, छत्रसालाची कामगिरी, स्वातंत्र्यवीर सावरकर याच विषयांवर व्याख्याने, स्लाईड शो यांचे आयोजन करून प्रचंड मोठा एल्गार करण्याची आवश्यकता आहे. Sanatana-corona-stalin दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व' या विषयावर परिसंवादाच्या आयोजनापासून पुन्हा नव्याने सुरू झालेला हा हिंदुत्व विरोध सनातन हिंदू धर्म कोरोनासारखा नष्ट केला पाहिजे इथवर येऊन पोहोचला आहे.
 
 
तो भारतातील २०२४ मधील निवडणुकांपर्यंत असाच चालू राहणार आहे. हिंदू समाज त्याच्यावर होणाऱ्या प्रच्छन्न आक्रमणाने पेटून उठत नाही, याची पुरेशी जाणीव इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मीयांना आहे. त्यामुळे जमेल तसे, मिळेल त्या मार्गाने ते सनातन हिंदू धर्मावर आघात करीत असतात. हिंदू समाजाचे आत्मभान, स्वत्वाची जाणीव जागृत होऊ नये याची पूर्ण काळजी नियोजनपूर्वक घेतली जाते. Sanatana-corona-stalin मग, द्रविड विरुद्ध आर्य, उत्तर विरुद्ध दक्षिण, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, मराठा विरुद्ध ओबीसी, कधी मराठी अस्मिता तर कधी तामिळ, तेलगू, कानडी अशा आमच्यातच झुंजी लावून देत आमचे खच्चीकरण केले जाते. फक्त हिंदू धर्मातील चुकीच्या प्रथा परंपरा, ज्यापैकी बऱ्याचशा आम्ही केव्हाच सोडून दिलेल्या आहेत, पुन्हा पुन्हा आम्हालाच सांगितल्या जातात. लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा फक्त हिंदू धर्म आणि हिंदू समाजाच्याच विरोधात वापर केला जातो. Sanatana-corona-stalin त्यामुळे समस्त हिंदू समाजाने एकत्र आलेच पाहिजे. कारण, या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ नजीकच्या भविष्यकाळात आलेली आहे, यात शंका नाही. नूपुर शर्मांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेणारे देशाचे सर्वोच्च न्यायालय उदयनिधी स्टॅलिनच्या वक्तव्याला दखलपात्र समजत नाही. त्यामुळे या सामाजिक उदारतेचा पुनर्विचार करण्याची वेळ आलीच आहे.
९८८१२४२२२४