वाशीम,
area of sericulture कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा रेशीम कार्यालय, यांच्या संयुक्त वतीने आंतर राज्य रेशीम शेतकरी अभ्यास दौरा २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला. या अभ्यास दौर्यात केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हैसूर येथे रेशीम शेतीतील यांत्रिकीकरण, तुतीच्या विविध जाती, त्यांची गुण वैशिष्टे, पानाचे प्रती एकरी वार्षिक उत्पादन, रेशीम कीटकांच्या विविध जाती, त्यापासून मिळणारे कोष उत्पादन, रंगीत कोष, बाल कीटक संगोपन केंद्र, आदर्श रेशीम कीटक संगोपन गृह, तुती रोपवाटिका, तुती वृक्ष लागवड, कीटक संगोपनानंतर उर्वरित काडी कचर्यापासून गांडूळ खत निर्मिती याबाबत सविस्तर माहिती जिल्हयातील रेशीम उद्योजकांनी घेतली.

मळवली येथील अंडीपुंज निर्मिती केंद्राला भेट देऊन अंडीपुंज निर्मिती कशी केली जाते याबाबत सविस्तर माहिती घेतली. कर्नाटक राज्यातील कनकपुरा तालुक्यातील किरणगिरे येथे व्यावसायिक बाल कीटक संगोपन कसे केले जाते. बाल कीटक संगोपनासाठी विशेष काळजी घेऊन तुती लागवड व्यवस्थापन कसे केली जाते, पाला कापण्याचे मशीन, आर्द्रता राखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, निर्जंतुकीकरण, संगोपनासाठी लागणारी जागा, दोन अवस्था पूर्ण झाल्यावर वातानुकूलित वाहनातून शेतकर्यांपर्यंत पुरवठा आदी बाबी बारकाईने पाहण्यास मिळाल्या. area of sericulture या केंद्राचे संचालक जगदीश यांनी रोगमुक्त कीटक पुरवठा करण्याकरीता प्रयोगशाळा उभारली आहे. अंडी अवस्थेत भ्रूण वाढ कशी आहे. हे तपासून ते बालकीटक संगोपन घेतात. वार्षिक १२० लक्ष अंडी पुंज घेऊन ते बाल कीटक संगोपन करून रेशीम उद्योजकांना वाटप करतात. जे कर्नाटक राज्यातील अंडी वाटपाच्या १० टक्के आहे. त्यांना या कामगिरीबद्दल कर्नाटक भूषण पुरस्कार मिळाला आहे. रामनगरम येथे आशिया खंडातील सर्वात मोठी रेशीम कोषाची बाजारपेठला भेट दिली. खरेदी विक्री कामकाजाची माहिती देण्यात आली. केंद्रीय रेशीम मंडळाचे तेथे एक कार्यालय आहे. शेतकर्यांची फसवणूक होऊ नये म्हणून रेशीम कोषाचे सिल्क टक्केवारी तेथे काढून दिली जाते.पाच दिवसांच्या या दौर्यात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील १० शेतकर्यांनी लक्षपूर्वक माहिती घेतली. आपल्या भागात अशाच पद्धतीने रेशीम उद्योग करण्याचे मनापासून ठरविले. रेशीम विकास अधिकारी एस. पी. फडके यांनी दौर्यात सर्व शेतकर्यांना मार्गदर्शन केले.