Pohradevi बंजारा आणि बहुजनांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील मंदिर ज्या जागेवर आहे, ती जागेची इसारचिठ्ठी ८ सप्टेंबर रोजी झाल्याने लवकरच नवीन मंदिर व परकोट पुनर्बांधणीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी अडीचशे वर्षांपूर्वीचे मंदिर व परकोट पाडकामास सुरूवात करण्यात आली.
८ सप्टेंबर रोजी येथील तहसील कार्यालयात श्री संत सेवालाल महाराज मंदिराची जागा गट नंबर २ क्षेत्रफळ २.२८ आर. मूळ मालक माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी शासनास आर्थिक मोबदला घेऊन इसारचिठ्ठी करून दिली. Pohradevi त्यामुळे आता श्री संत सेवालाल महाराज मंदिर बांधकाम व मंदिर परिसरातील भाविक भक्तांच्या सोयी सुविधा निर्माण करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे संत श्री सेवालाल महाराज यांच्या अडीचशे वर्षांपूर्वीचे मंदिर व परकोट पाडकामास १० सप्टेंबरपासून सुरूवात झाली. लवकरच नवीन मंदिर व परकोट पुनर्बांधणीला सुरुवात होणार आहे.