सूर्याजवळ जाताना...

    दिनांक :14-Sep-2023
Total Views |
विचार विनिमय
अनेक शतकांपासून नव्हे तर लक्षावधी वर्षांपासून मानव समाज सूर्यदेवाची उपासना करीत आला आहे. सूर्य मंडळाच्या मध्यभागी असलेल्या सूर्याविषयी असे मानले जात होते की, दिवसाची सुरुवात त्याच्या उगवण्याने होते आणि त्याच्या मावळतीने रात्रीचा प्रारंभ होतो. सर्वच संस्कृतींमध्ये सूर्यपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हा सर्व संस्कृतींचे एक अभिन्न अंग आहे. आता मानवी समुदायाच्या प्रवासात एक नवे वळण आले आहे. काही दिवसांपूर्वी भारताने चांद्रयान-3 हे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवले आहे.
 
 
Aditya L-1 : दूरचे चंदा मामा दूरच राहिले, पण आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलो. सूर्याची कहाणी वेगळी आहे, कारण तो कल्पना करू शकणार नाही, इतका उष्ण ग्रह आहे. तरीही भारताने आदित्य एल-1 नावाचे पहिले मिशन सूर्याच्या दिशेने पाठवले आहे. हे मिशन सूर्याच्या कक्षेतील परिस्थितीच्या तपासणीसाठी जात असून, याअंतर्गत भारतीय यान अंदाजे पंधरा लाख किलोमीटर प्रवास करेल. हे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या तुलनेत फक्त एक टक्का आहे. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर अंदाजे 15 कोटी किलोमीटर आहे.
 
Aditya L-1
 
आत्तापर्यंत सूर्याच्या खूप जवळ जाणे अशक्य होते. भविष्यात ते शक्य होऊ शकते. खगोलशास्त्रीय यांत्रिकीमध्ये लग‘ांज बिंदू नामक जागेचा उल्लेख आढळतो. पृथ्वीपासून अंतराळात सरळ अंतरावर सूर्याच्या स्थानापर्यंत सूर्य आणि पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती समान असते, त्याला लग‘ांज बिंदू म्हणतात. (Aditya L-1) आदित्य एल-1 या बिंदूच्या पहिल्या स्तरावर फिरेल आणि फिरताना सूर्याच्या बाह्य पृष्ठभागाचा अभ्यास करेल. इस्रोच्या मते, हा प्रवास 135 दिवसात पूर्ण होईल.
 
 
या मोहिमेतून सूर्यमालेतील घडामोडी, सूर्याभोवतीचे वातावरण आणि त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. ही सर्व माहिती केवळ भारतासाठीच नव्हे तर सार्‍या जगासाठी उपयुक्त ठरणार आहे. भारताकडे 50 हून अधिक उपग्रह आहेत. त्या उपग्रहांमार्फत दूरसंचारापासून वातावरणापर्यंत अनेक बाबींमध्ये मानवी समुदायाला मदत होत असते. ज्या तार्‍यावर आपले सारे जीवन अवलंबून आहे, त्याबद्दल आपल्याला माहितीचा अधिक उलगडा करण्यास आदित्य एल-1 सक्षम आहे.
 
 
या (Aditya L-1) अंतराळ अभियानाच्या यशामुळे सूर्याचा अभ्यास करणार्‍या जगातील निवडक देशांच्या यादीत आपला समावेश होईल. यामुळे भारताचा आदर वाढेल. सूर्याविषयी सर्व काही कल्पनेपलीकडचे आहे. उष्णतेचा मुद्दा बाजूला ठेवला तरी, सूर्याचे वजन पृथ्वीच्या वजनापेक्षा 3 लाख 33 हजार पट जास्त आहे, हे जाणून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहवत नाही. सूर्य इतका मोठा आहे की, पृथ्वीसारखे 13 लाख ग‘ह त्यात बसू शकतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर 10 हजार फॅरेनहाइटपेक्षा जास्त उष्णता आहे, जी लाखो किलोमीटर अंतरावरून पृथ्वीवर पोहोचवणारा सूर्य मानव जन्मावर उपकारच करीत आहे.
 
 
आपले जीवन, आपले सर्व कार्य, अगदी आपले रोग, औषधांचा प्रभाव देखील सूर्याच्या उष्णतेवर अवलंबून असतो. उष्णता जास्त असेल तर पृथ्वी गरम होते, कमी असेल तर ती आकुंचित होते. या अभ्यासातून एक नवीन पर्व सुरू होईल, जे अनेक दशके टिकेल. चंद्रानंतर आपले अंतराळयान सूर्याकडे पाठवणे, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. ज्या वेळी आपले शेजारी देश परस्परातील वाद मिटवण्यात अपयशी ठरत आहेत, अशा वेळी भारताचे अंतराळातील हे शौर्य प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने उंचावणारे आहे. आपण एकच गोष्ट समजून घेतली पाहिजे की, आपला वारसा, संस्कृतीसोबतच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानच आपल्याला सर्वांच्या पुढे घेऊन जाऊ शकते. गेल्या पंधरा दिवसात दोनदा ही बाब आपण सिद्ध करून दाखविली आहे.
 
हिंदी साप्ताहिक भारतवाणीहून साभार