- 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम
नवी दिल्ली,
Birth Certificate Importance सरकार दरबारी जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व येत्या काही दिवसात खूप वाढणार आहे. यापुढे शाळा-महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना, वाहन परवान्यासाठी करताना, मतदार यादीत नाव समाविष्ट करताना, तसेच आधार नोंदणी, विवाह नोंदणी किंवा सरकारी नोकरीच्या अर्जासाठी यापुढे आता फक्त जन्म प्रमाणपत्राचाच वापर होणार आहे. जन्म आणि मृत्यूची नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 येत्या 1 ऑक्टोबरपासून देशभरात लागू होणार आहे. त्यामुळे यापुढे आता सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी फक्त जन्म प्रमाणपत्राचाच वापर होणार आहे.
Birth Certificate Importance जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा विधेयक 1 ऑगस्ट रोजी लोकसभेत आणि 7 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यामध्ये 1962 च्या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मागणी मंजूर झाल्यानंतर येत्या 1 ऑक्टोबरपासून सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी जन्म प्रमाणपत्राचाच वापर होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी एक अधिसूचना जारी करून 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायद्यामुळे भारताच्या रजिस्टार जनरलला नोंदणीकृत जन्म आणि मृत्यूचा राष्ट्रीय डेटाबेस राखण्याचा अधिकार मिळणार आहे. यासाठी सर्व राज्यांकडून मु‘य निबंधक नियुक्त केले जातील. हे अधिकारी राष्ट्रीय डेटाबेसमध्ये नोंदणीकृत जन्म आणि मृत्यूचा डेटा भारताच्या रजिस्ट्रार जनरलकडे शेअर करण्यास बांधील असतील. यानंतर मु‘य निबंधक राज्यस्तरावर एकसमान डेटाबेस तयार करतील.
Birth Certificate Importance नोंदणीकृत जन्म-मृत्यूची राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर डेटाबेस स्थापित करणे हे जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक‘मामुळे इतर डेटाबेससाठी अपडेट प्रकि‘या वाढवणे, कार्यक्षम आणि पारदर्शक सार्वजनिक सेवांना प्रोत्साहन देणे आणि सामाजिक लाभ वितरण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना एकप्रकारे याचा फायदाच होणार आहे.