काँग्रेस पक्षाचा घसरता आलेख

    दिनांक :14-Sep-2023
Total Views |
द़ृष्टिक्षेप
-अभय कुमार
 
काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस पतनाचे नवनवीन परिमाण निर्माण करीत आहे. ही पडझड मल्लिकार्जून खडगे यांच्या कार्यकाळापूर्वीच मोठ्या प्रमाणावर सुरू झाली होती. यापुढे पक्षाला वाचवता येणार नाही, हे गांधी घराण्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी खडगे यांना बळीचा बकरा बनवण्यासाठी समोर उभे केले.
 
 
Congress Party : सध्या काँग्रेस पक्षाकडे चार राज्यांत एकही आमदार नाही. ही चार राज्ये म्हणजे आंध्र प्रदेश, दिल्ली, नागालँड आणि सिक्कीम. 337 आमदार निवडून देणार्‍या या चार राज्यांत काँग्रेस पक्षाकडे एकही आमदार नसणे, ही बाब समर्थनीय कशी म्हणता येईल? अलीकडेच पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या सागरदिघी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्षाचे खाते उघडले होते. परंतु पक्षाच्या आमदाराने निवडून येताच एआयटीसीमध्ये प्रवेश केला. 294 संख्याबळ असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेस पक्षाकडे आता पुन्हा एकही आमदार नाही. एआयटीसीच्या अशा कुरापती सुरू असूनही, काँग्रेस पक्ष आणि एआयटीसी ही आघाडी नवनिर्मित आय.एन.डी.आय.ए. (इंडिया) अंतर्गत युतीचा शोध घेत आहे. त्रिपुरामध्येही काँग्रेस पक्षाकडे एकही आमदार नव्हता, पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या मदतीनेच पक्षाला खाते उघडता आले.
 
Congress Party
 
सध्या देशातील सर्व राज्यांमध्ये आमदारांची एकूण संख्या 4033 आहे. जम्मू-काश्मीर राज्य अस्तित्वात असताना ही संख्या 4120 होती. आता या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीनंतर ही संख्या 4033 वर आली. आणि जम्मू काश्मीरच्या परिसीमनानंतर विधानसभेतील जागा वाढल्याने देशातील एकूण आमदारांची संख्या 4123 वर पोहोचली आहे. यात (Congress Party) काँग्रेस पक्षाकडे सध्या फक्त 725 आमदार आहेत, जे एकूण संख्येच्या केवळ 17.97 टक्के आहेत. यामध्ये अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, मेघालय, ओडिशा, पुद्दुचेरी, तेलंगणा, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेशमधील काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या एक अंकी झाली आहे. या सर्व राज्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 1373 जागा असून, काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या 44 वर पोहोचली आहे, जी 3.20 टक्के आहे. काँग्रेस पक्षाचे शून्य किंवा एक अंकी सदस्य असलेल्या राज्यांची एकूण संख्या 15 वर गेली आहे. या 15 राज्यांच्या एकूण 1710 सदस्यसंख्येच्या विधानसभेत काँग्रेस सदस्यांची संख्या 44 वर पोहोचली आहे.
 
 
लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर (Congress Party) काँग्रेस पक्षाने 52 जागा जिंकल्या. त्यापैकी केरळ, तामिळनाडू आणि पंजाब या तीन राज्यांतून काँग्रेस पक्षाला 31 जागा मिळाल्या. या तीन राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाने मित्रपक्षांसह 38 जागांवर निवडणूक लढवली होती, ज्यात 31 जागा पक्षाच्या पदरात पडल्या. उर्वरित राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाने 383 जागा लढवून केवळ 21 जागा जिंकल्या. ही बाब लक्षात घेतली पाहिजे की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकूण 421 जागांवर निवडणूक लढवली आणि 148 जागांवर पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. जी पक्षाने लढवलेल्या जागांच्या 35.15 टक्के आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 52 जागा जिंकल्या होत्या आणि 209 जागांवर हा पक्ष दुसर्‍या क‘मांकावर होता. म्हणजेच काँग्रेस पक्षाचा थेट दावा 261 जागांवर कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 49 जागांवर 2 टक्क्यांहून कमी मते मिळाली होती. 127 जागांवर पक्षाला एक गुण म्हणजे 10 टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली. काँग्रेस पक्षाच्या लोकसभेत केवळ एका राज्यात, केरळमध्ये दुहेरी आकडी जागा आहेत, परंतु उर्वरित 17 राज्यांमध्ये त्यांच्याकडे एक अंकी जागा आहेत.
 
 
उत्तर प्रदेशातील 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर, गांधी परिवार अमेठी आणि रायबरेलीच्या पारंपरिक जागा जिंकण्याची शक्यता धूसर झाली आहे. अमेठी लोकसभेच्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाला केवळ 1,42,952 मते मिळाली आणि हा पक्ष भाजप/एनडीए आणि सपा यांच्या मागे तिसर्‍या क‘मांकावर फेकला गेला. रायबरेलीच्या जागेवर काँग्रेस पक्षाला 1,40,706 मते मिळाली आणि तिथेही पक्ष सपा आणि भाजप/एनडीएपेक्षा खूप मागे राहिला.
 
 
2022 च्या विधानसभा निवडणुकीत (Congress Party) काँग्रेस पक्षाची निराशाजनक कामगिरी लक्षात घेता समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना हे जाहीर करणे भाग पडले की, त्यांचा पक्ष लोकसभेच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याचा विचार करीत आहे. उत्तरप्रदेशातील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेस पक्षाला 62 विधानसभा जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि भाजपमध्ये एकूण 190 जागांवर थेट लढत झाली होती आणि काँग्रेस पक्षाला 175 जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. एकूण 18 राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांतून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही.
 
 
केरळमध्ये (Congress Party) काँग्रेस पक्षाला 15 जागा मिळाल्या. या राज्यात राजकारणाचा अनोखा प्रकार आहे. येथील लोक काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आणि डाव्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला आलटून पालटून संधी देतात. यावेळी केरळमध्ये सीपीआय(एम)च्या नेतृत्वाखालील एलडीएफची पाळी आहे, जिथे ते लोकसभेच्या जागा मोठ्या प्रमाणात जिंकू शकतात. काँग्रेस पक्ष सीपीआय(एम) आणि कम्युनिस्ट पक्षांसोबत युती करण्याबाबत संदिग्ध आहे. त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष एकमेकांचे सहयोगी आहेत, तर केरळमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांचे मु‘य प्रतिस्पर्धी आहेत.
 
 
1982 पासून केरळमध्ये निवडणुकीनंतर एलडीएफ आणि यूडीएफला सरकार स्थापन करण्याची संधी मिळत होती, परंतु 2021 च्या केरळ विधानसभा निवडणुकीत 1982 नंतर प्रथमच एलडीएफची सत्ता अबाधित राहिली आणि यूडीएफवर पुन्हा विरोधी पक्षात बसण्याची पाळी आली. 2019 पासून राहुल गांधी केरळच्या मुस्लिमबहुल वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना हे घडले आहे. गांधी कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच केरळचे प्रतिनिधित्व करीत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना 705034 मते मिळाली, जी एकूण मतदानाच्या 64.81 टक्के होती. तर 2021 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस/युडीएफची मते 521825 वर आली, जी राहुल गांधींना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा 27 टक्क्यांनी कमी आहे. राहुल गांधींच्या लोकप्रियतेची ही एकप्रकारे कसोटीच आहे.
 
 
गेल्या विधानसभा निवडणुकीतील मेघालयातील प्रयोगावरून (Congress Party) काँग्रेस पक्षाच्या दुर्दशेचे आकलन होऊ शकते. इतर अनेक राज्यांप्रमाणे पक्षाला शून्य जागा मिळण्याची भीती असल्याने काँग्रेस पक्षाने शिलाँगचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री व्हिन्सेंट पाला यांना उमेदवारी दिली. पण मेघालयात काँग्रेसला 5 जागा मिळाल्या, तर शिलाँगचे खासदार व्हिन्सेंट पाला स्वतःच्या मतदारसंघात पराभूत झाले. काँग्रेस पक्षाच्या खासदारांच्या लोकप्रियतेची कसोटी म्हणूनही या निकालाकडे पाहिले जाऊ शकते. भगवंत मान मु‘यमंत्री झाल्यानंतर संगरूर लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीने पंजाबमधील काँग्रेस पक्षाची चिंता वाढविली आहे.
 
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत संगरूरमध्ये (Congress Party) काँग्रेस पक्ष 3,03,350 मतांसह दुसर्‍या क्रमांकावर होता, तर 2022 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाला येथे फक्त 79,668 मते मिळाली. संगरूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डिपॉझिटही गमावले. संगरूरप्रमाणेच काँग्रेस पक्षाला जालंधर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाचे खासदार संतोख सिंग चौधरी यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. 1999 पासून वेगवेगळे उमेदवार उभे करूनही काँग्रेस या जागा जिंकत होती. काँग्रेसने दुसर्‍या कुणाच्याही नावाचा विचार न करता या जागेवर त्यांच्या विधवेला उमेदवारी देऊन भावनिक कार्ड खेळायला भाग पाडले. पण 1999 नंतर प्रथमच काँग्रेसला ही जागा गमवावी लागली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी केली होती, त्या संगरूर आणि जालंधर मतदारसंघांच्या निकालांनी पंजाबमधील काँग्रेस पक्षाची पार निराशा झाली.
 
 
तेलंगणाच्या मुनुगोडे विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरूनही भारत जोडो यात्रेच्या प्रभावाचे आकलन केले जाऊ शकते. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत (Congress Party) काँग्रेस पक्षाने 97239 मते मिळवून विधानसभेची ही जागा काबीज केली होती, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्ष 79843 मतांसह या जागेवर पहिल्या क‘मांकावर राहिला होता. पण 2022 च्या पोटनिवडणुकीत विधानसभेच्या या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला केवळ 23894 मते मिळाली आणि पक्षाची अनामत रक्कमही जप्त झाली. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तेलंगणातून पार पडल्यानंतर ही पोटनिवडणूक झाली होती, ही बाब लक्षात घ्यायला हवी.
 
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मदारसंघनिहाय जागांवर निरनिराळ्या (Congress Party) पक्षांच्या आणि युतीच्या कामगिरीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भाजप 2087 (50.65 टक्के जागांवर तर या पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी 2412 (58.40 टक्के) जागांवर आघाडी प्रस्थापित करू शकली. त्या तुलनेत काँग्रेस पक्ष केवळ 609 (14.78 टक्के) विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी प्रस्थापित करू शकला. याचवेळी संयुक्त पुरोगामी आघाडीला विधानसभेच्या 861 (20.89 टक्के) जागांवर आघाडी मिळाली होती. नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. काँग्रेस आणि भाजपाने यापैकी प्रत्येकी एक जागा जिंकली. दोन्ही जागांवर मिळालेली मते पाहता भाजप अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने काँग्रेसपेक्षा (महाविकास आघाडी) 25 हजाराहून अधिक मते जास्त घेतली आहेत.
 
 
हिमाचल प्रदेशच्या विजयाने काँग्रेस पक्षात आनंदाची लहर आलेली होती; त्यांना खूप दिवसांनी विजयाची चव चाखायला मिळाल्याने ही खुशी स्वाभाविकही होती. परंतु, संपूर्ण राज्यात (Congress Party) काँग्रेस भाजपपेक्षा केवळ 37,974 मतांनी पुढे होती, ही बाब देखील ध्यानात घेतली जायला हवी. हिमाचल प्रदेशसोबतच गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. गुजरातमध्ये काँग्रेसची ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी ठरली. कर्नाटकची विधानसभा निवडणूक मात्र काँग्रेस पक्षासाठी सकारात्मक बातमी घेऊन आली आहे. या निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस आपल्या मित्रपक्षांसोबत बैठका आयोजित करीत आहे. काँग्रेस पक्षाने अशा बैठका घेण्याचे धाडस यापूर्वी केले नाही, कारण ते त्यांच्या मित्रपक्षांनीही स्वीकारले नसते. पण कर्नाटकातून मिळालेली गती कायम राखणे काँग्रेसला येत्या काळात अत्यंत कठीण जाणार आहे.
 
ऑर्गनायझरहून साभार