जी-20 जागतिक समाधानासाठी भारतीय नीतिमत्ता आणि मूल्ये

    दिनांक :14-Sep-2023
Total Views |
मागोवा
 
प्रा. सचिन चतुर्वेदी
 
भारताच्या अध्यक्षपदाने जागतिक दक्षिणेच्या गरजांवर विशेष लक्ष केंद्रित करून असंख्य आव्हानांना तोंड देत सर्व सदस्य राष्ट्रांसाठी सर्वसमावेशक आणि लवचिक आर्थिक वाढीचा मार्ग दाखवला आहे.
 
G-20 : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाने भारतीय तत्त्वज्ञान, आचारविचार, नीतिमूल्ये आणि प्रथांमधून निर्माण झालेल्या विचारांच्या आधारावर प्रभावी आणि सर्वाधिक प्रासंगिक उपाय ठेवले आहेत. गेल्या काही वर्षांत जागतिक समुदायाला ज्या व्यापक आव्हानांचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे अधिकच गुंतागुंत निर्माण झाली आहे आणि हवामान बदल, भू-राजकीय संघर्ष, टोकाची असमानता आणि अनेक पातळ्यांवर विखंडन या बहुसंकटात जग अडकले आहे.
 
G-20
 
’एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या कल्पनेसह, भारताने जैवविविधता संरक्षण, जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी गळीशृंखलेचे अशस्त्रीकरण करणे आणि सर्वसमावेशक जागतिक सुव्यवस्था सुनिश्चित करण्याचा आर्थिक वाढीच्या विरोधाभासी स्वरूपाचा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा शृंखलेचे अशस्त्रीकरण करणे आणि सर्वसमावेशक जागतिक सुव्यवस्था सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. (G-20) जी-20 संघटन अधिक प्रभावी होण्यासाठी निश्चितच विश्वास, मानवी दृष्टिकोन आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. ही मूल्ये आता सर्व भागीदार देशांमध्ये लवचिक वाढीस चालना देण्यासाठी आवश्यक ठरली आहेत. कर्जाचे संकट, पुरवठा साखळीतील व्यत्यय हे आत्म-केंद्रित दृष्टिकोनाचे परिणाम आहेत.
 
 
‘ग्लोबल साउथ’वर लक्ष केंद्रित करा
‘ग्लोबल साउथ’ अर्थात जागतिक दक्षिणेवर लक्ष केंद्रित करून, भारताने भविष्यातील G-20 जी-20 अजेंडा सेटिंगमध्ये विकसनशील देशांचा दृष्टिकोन एकत्रित करण्यासाठी आणि त्यांचा सहभाग मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आफि‘कन युनियनचा समावेश करण्याच्या सूचनेमुळे एक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्थेचा मार्ग प्रशस्त झाला आहे. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून, हरित विकास, हवामान, वित्त आणि जीवन, त्वरित सर्वसमावेशक आणि लवचिक वाढ, एसडीजीवर गतिमान प्रगती करणे; तांत्रिक परिवर्तन आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, 21 व्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यावर भर दिला गेला आहे.
 
 
जी-20 च्या कार्यरत आणि प्रतिबद्धता गटांनी या विषयांवर चर्चा केली आहे आणि त्यांना पुढे नेण्याच्या विशिष्ट पद्धती ओळखल्या आहेत. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काही महत्त्वाच्या पुढाकारात शाश्वत विकासासाठी जीवनशैलीवर जी-20 उच्चस्तरीय तत्त्वे (एचएलपी), डिजिटल आरोग्यावर जागतिक पुढाकार, संयुक्त वित्त आणि आरोग्य टास्क फोर्स (जेएफएचटीएफ), शाश्वत आणि हवामान लवचिक ब्लू इकॉनॉमीसाठी एचएलपी, ग्लोबल मेडिकल काउंटरमेझर्स (एनसीएम) समन्वय मंच, एक आरोग्य-आधारित आरोग्य आणिबाणी प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद (एचईपीपीआर) इत्यादींचा समावेश आहे.
 
 
भारताने उदयोन्मुख समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी आपत्ती जोखीम लवचिकता (डीआरआर) आणि स्टार्ट-अप 20 वर प्रतिबद्धता इत्यादी विषयांचाही समावेश केला आहे. भारताने आपल्या अध्यक्षीय कार्यकाळात केवळ स्वत:साठीच नव्हे तर मोठ्या जागतिक दक्षिण समुदायासाठी देखील आवाज बुलंद केला आहे. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर संमेलनाच्या एका प्रमुख आंतरराष्ट्रीय मंचावर ग्लोबल साऊथच्या चिंता उचलून धरण्याच्या भारताच्या प्राधान्याचे हे एक उल्लेखनीय प्रदर्शन आहे.
 
 
पर्यावरणासाठी जीवनशैली
जग परस्परांशी जोडलेल्या संकटांशी झुंजत असताना, भारतीय अध्यक्षांच्या नेतृत्वात G-20 जी-20 ची सक्रिय भूमिका, वेगाने वाढणार्‍या जागतिक गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि दूरगामी रणनीतीची क्षमता प्रदर्शित करते. त्याचे एक प्रकटीकरण, अभिव्यक्ती ‘लाईफ’ (पर्यावरणासाठी जीवनशैली) वरील केंद्रीकरणातून (फोकस) दिसून येते. संसाधनांच्या उत्खननासह आर्थिक विकासाच्या चुकीच्या प्राधान्यक‘मांचे संरेखन करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी बाली येथे जी-20 शिखर परिषदेत केलेल्या आपल्या भाष्यात ‘लाईफ’ चे महत्त्व अधोरेखित केले होते. ‘पृथ्वीच्या, वसुंधरेच्या सुरक्षित भविष्यासाठी विश्वस्ततेची भावना हाच उपाय आहे. ‘लाईफ’ अभियान यामध्ये मोठे योगदान देऊ शकते. शाश्वत जीवनशैलीला लोकचळवळ बनवणे हा याचा उद्देश आहे,’ असे पंतप्रधानांनी नमूद केले होते.
 
 
हवामान बदलावरील जागतिक चर्चेत बदल करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी G-20 जी-20 बाली नेत्यांच्या जाहीरनाम्याने शाश्वत विकास आणि जीवनशैली, संसाधन दक्षता आणि चक‘ाकार अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेला मान्यता दिली आहे. भारतीय जी-20 च्या अध्यक्षतेखाली, प्रकि‘येअंतर्गत लाईफस्टाईल फॉर एनव्हायरमेंट (एलआयएफई) वर एक अद्वितीय ‘थिंक-20’ (टी-20) टास्क फोर्स अर्थात कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. लवचिकता आणि कल्याणासाठी हे कृतिदल प्रामु‘याने पर्यावरणासाठी जीवनशैली (लाईफ) च्या समग‘ पैलूंवर आणि वित्तपुरवठा आणि तंत्रज्ञानाच्या आमच्या आर्थिक मॉडेलमध्ये नैतिकता आणि मूल्य प्रणाली कशी आणावी यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
 
 
शाश्वत विकासासाठी जीवनशैलीची उच्चस्तरीय सिद्धांत स्वीकारणे हे लाईफ (पर्यावरणासाठी जीवनशैली) तत्त्वज्ञानाला, संकल्पनेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक मैलाचा दगड होता. नऊ तत्त्वे शाश्वत विकास दृष्टिकोनासाठी जीवनशैलीच्या केंद्रस्थानी असलेल्या विकास, पर्यावरण आणि हवामान अजेंडा आणि त्यांच्याशी संबंधित उद्दिष्टे यांच्यातील परस्परसंबंधांना चालना देण्यासाठी मार्ग तयार करतात. भारताच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकासासाठी जीवनशैलीवरील उच्चस्तरीय तत्त्वांसह, जी-20 ने एसडीजी ला गती देण्यासाठी सात वर्षांची कृती योजना देखील स्वीकारली आहे.
 
 
सहयोग आणि नवोपक्रम
अभूतपूर्व व्यापक आर्थिक आव्हानांच्या युगात, भारतीय अध्यक्षतेखाली, G-20 जी-20 जागतिक सहकार्य आणि नवकल्पनासाठी एक उल्लेखनीय उदाहरण प्रस्थापित करीत आहे. 21व्या शतकातील जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बहुपक्षीय विकास बँका (एमडीबी) बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने धोरण विकसित करण्याची समूहाची वचनबद्धता दिसून येते. यामध्ये भांडवल पर्याप्तता फ्रेमवर्क लागू करण्यासाठी रोडमॅप अर्थात आराखड्याला मान्यता देणे आणि ग्लोबल साउथच्या संकटग‘स्त अर्थव्यवस्थांसाठी आवश्यक असलेल्या समन्वित कर्ज उपचारांना प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे. डिजिटल पब्लिक इन्फ‘ास्ट्रक्चर (डीपीआय) अजेंडाद्वारे भारताचा डिजिटल परिवर्तनाचा प्रतिध्वनी दिसून येतो. आर्थिक समावेशकता आणि उत्पादकता वाढवण्यात डीपीआयची सखोल भूमिका मान्य करून, जी-20 धोरण शिफारशींचे समर्थन सर्वसमावेशक वाढ आणि तांत्रिक प्रगतीचा मार्ग मोकळा करते. त्याच बरोबर, कि‘प्टो मालमत्तेच्या मॅक्रो-आर्थिक परिणामांना संबोधित करण्यावर जी-20 चा भर जटिल आर्थिक समस्या सोडविण्यासाठी आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या चिंतांना प्राधान्य देते.
 
 
हवामान वित्तविषयक चर्चा आणि साथीच्या रोगाचा प्रतिबंध आणि प्रतिसाद वाढवण्याचे प्रयत्न G-20 जी-20 च्या जागतिक आव्हानांसाठी व्यापक दृष्टिकोन अधोरेखित करतात. याव्यतिरिक्त, कर पारदर्शकता, आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला आणि कर समन्वय वाढवण्याची अटूट वचनबद्धता अधिक न्याय्य आणि उत्तरदायी आर्थिक वास्तुकला आकार देण्यासाठी जी-20 च्या भूमिकेची पुष्टी करते.
 
 
भविष्यासाठी अर्थव्यवस्था
जी-20 अध्यक्षपद भारताकडे असल्याने, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय डिजिटल क्षेत्रात महत्त्वाकांक्षी अजेंडा पुढे नेत जी-20 डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप (डीईडब्ल्यूजी) चे नेतृत्व करीत आहे. डीईडब्ल्यूजी चे तीन प्राधान्य क्षेत्र डिजिटल पब्लिक इन्फ‘ास्ट्रक्चर, डिजिटल इकॉनॉमीमधील सुरक्षा आणि डिजिटल स्किलिंग भविष्यासाठी तयार अर्थव्यवस्थेला आकार देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतात. चर्चेच्या अंतिम टप्प्याला चिन्हांकित करताना, बंगळुरू येथे आयोजित चौथी डीईडब्ल्यूजी बैठक, या गंभीर मुद्यांवर जी-20 चा दृष्टिकोन अधोरेखित करण्यात महत्त्वपूर्ण ठरली. जी-20 समूहाने या प्राधान्य क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक आणि प्रभावी कृतीची गरज अधोरेखित केली.
 
 
जी-20 सदस्य राष्ट्रे, निमंत्रित देश आणि ओईसीडी, आयटीयू, यूएनडीपी, जागतिक बँक आणि युनेस्को सार‘या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 100 हून अधिक प्रतिनिधींसह ही बैठक उत्कृष्ट जागतिक सहकार्याचे प्रतीक आहे. जी-20 चे डिजिटल लँडस्केप पुढे नेण्याचे समर्पण ‘जी-20 डिजिटल अर्थव्यवस्था मंत्रिस्तरीय घोषणापत्रा’च्या अवलंबाने स्पष्ट होते. त्यामुळेच ग्लोबल साउथमधील अनेक सहभागींसह, ही शिखर परिषद सहयोग आणि प्रगतीच्या जागतिक भावनेचे प्रतीक आहे. भारताचे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद जागतिक समुदायाला मानवतेसाठी स्थिर, समावेशक आणि समृद्ध अशा भविष्याकडे घेऊन जाण्याची वचनबद्धता अधोरेखित करते. जी-20 मधील विकासाचा नवीन दृष्टिकोन आशा, सुसंवाद व सद्भावनेचे प्रतीक आहे.