अडीच वर्षे माशा मारत होता का?

    दिनांक :16-Sep-2023
Total Views |
- देवेंद्र फडणवीसांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर, 
आमच्याकडून एखादा निर्णय मागे राहिला तर, तो घेण्याची किंवा आम्ही घेतलेले निर्णय पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्ही अडीच वर्षे माशा मारत होतात का? असा खडा सवाल उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला केला.
 
 
devenda sanmbhaji
 
फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळाची याआधीची जी बैठक आम्ही संभाजीनगरमध्ये घेतली होती, त्या बैठकीतील जवळपास सर्व निर्णयांची अंमलबजावणी झालेली आहे. त्याची माहिती आम्ही पत्रकारांना देणार आहोत. परंतु, आज जे लोकं म्हणत आहेत की, मागच्या बैठकीत काय झाले, त्यांना माझा सवाल आहे, अडीच वर्षांत तुम्ही मराठवाड्यासाठी काय केले, तुम्ही सरकारमध्ये होता ना.
मराठवाडा वॉटरग्रीडचा मुडदा पाडला
मराठवाडा वॉटरग्रीडचा मुडदा पाडण्याचे काम ज्या सरकारने केले, आता तेच आम्हाला प्रश्न विचारत आहेत. मराठवाड्याला जे दिले होते, त्याचाही या लोकांनी मुडदा पाडला आहे. मराठवाड्याच्या हितासाठी बैठक होत असेल तर, ती हाणून कशी पाडायची, हा यांचा कावा आहे, हे कावेबाज लोक आहेत, अशा शर्ब्दात Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.