High Court on divorce न्यायालयात घटस्फोटाची मागणी करणाऱ्या या जोडप्याचा विवाह २००७ मध्ये लग्न झाला होता. पण, लग्नाच्या काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. उल्लेखनीय हे की, पतीने वर्ष २०१२ मध्ये महापालिका निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१३ मध्ये त्याच्याविरोधात पत्नीने गुन्हा दाखल केला होता. High Court on divorce आपल्यावर केलेल्या एफआयआरमधील बिनबुडाच्या आरोपांमुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रतिमा मलिन झाल्याचे पतीने न्यायालयाला सांगितले. याउलट पत्नीने आरोप केला की, पती आणि त्याच्या कुटुंबियांनी नेहमीच आपला अपमान केला. तिच्या आरोपांनुसार ते वैवाहिक जीवन भयावह होते. High Court on divorce पतीने तिला २००९ मध्येच तिच्या पालकांच्या घरी सोडलं आणि तेव्हापासून ते वेगळे राहत आहेत. पती रात्री उशिरा घरी येतो आणि अपमानित करण्याच्या उद्देशाने आपल्यावर ओरडायचा, असं पत्नीने न्यायालयात सांगितलं.
दुसरीकडे पतीने आरोप केला आहे की, आपलं संयुक्त कुटुंब असून आपण एकत्र कुटुंबातच राहणार असल्याचे आपण लग्नापूर्वीच तिला सांगितले होते. High Court on divorce पण, लग्नानंतर तिने याबाबत तक्रार केली आणि आपण वेगळं राहायचा हट्ट ती करू लागली. ती आपल्या आई-वडिलांचा आदर करत नाही आणि त्यांची काळजी घेत नाही. शिवाय तिने घरदेखील सोडले आहे, असे आरोप पतीने केले आहेत. तपासणीत, पत्नीने पतीवर खोटे आरोप केल्याचं उघड झालं असून हे आरोप खटल्यादरम्यान तिच्या साक्षीशी जुळले नाहीत.