-नासाच्या दुर्बिणीची कमाल
वॉशिंग्टन,
मानवाने तयार केलेल्या सर्वांत शक्तिशाली दुर्बिणींपैकी एक नासाच्या James Webb Space जेम्स वेब स्पेस दुर्बिणीने एका नवजात तार्याच्या पराध्वनिक बहिर्वाहची (सुपरसॉनिक आऊटफ्लो) अतिशय सुंदर छायाचित्रे घेतली आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून हजारो वर्षांंपूर्वी आपला सूर्य कसा दिसत असेल, याची झलक मिळते. या दुर्मिळ प्रतिमेमध्ये तार्याचे वायूचा वेगवान प्रवाह बाहेर पडत असून, तार्यांच्या ध्रुवांवरून स्फोट होत आहे तसेच पराध्वनिक वेगाने बाहेर पडत असल्याचे दिसून आले.
James Webb Space : विशेष म्हणजे, प्रतिमेत दिसल्याप्रमाणे नवजात तार्यांच्या सभोवतालच्या चमकदार प्रदेशांना हर्बिग-हारो ऑब्जेक्ट्स म्हणतात. त्याला हर्बिग-हारो (एचएच) 211 म्हटले आहे. पर्शियर नक्षत्रातील हा तारा पृथ्वीपासून जवळपास हजार प्रकाश वर्षे दूर आहे. आपल्या सूर्याचे बाल्यावस्थेत छायाचित्र घेतले असते, तर तो कदाचित असाच दिसला असता, असे नासाने हे छायाचित्र प्रसारित करताना एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या दुर्बिणीच्या प्रतिमेत एक नवजात तारा आहे, ज्याच्या ध्रुवांवरून पराध्वनिक वेगाने वायू बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. हा तारा केवळ दहा हजार वर्षांचा आहे. तो मोठा होईल, त्यावेळी तो आपल्या सूर्यासारखा दिसेल, असे नासाने म्हटले आहे.
James Webb Space या नवजात तार्यांकडून तारकीय वारे किंवा प्रचंड वेगाने वायू बाहेर पडतो तेव्हा जवळच्या वायूशी आणि त्याच्या उच्चवेगाने धुळीसोबत टक्कर होऊन शॉक वेव्ह तयार होतात. हा तरुण तारा शून्य वर्गातील प्रोटोस्टार आहे. तो केवळ काही हजार वर्षांचा आहे आणि त्याचे वस्तुमान सूर्याच्या आठ टक्के आहे. मात्र, कालांतराने तो सूर्यासारखा होण्याचा अंदाज आहे. तार्यातून उत्सर्जित होणारे हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड आणि सिलिकॉन मोनॉक्साईडच्या रेणूंद्वारे उत्सर्जित होणार्या इन्फ्रारेड प्रकाशामुळे दुर्बिणीला बाहेर वाहणार्या वायूचा नकाशा तयार करण्यास मदत झाली. तार्याच्या सभोवतालचे दृश्य या प्रतिमेत कैद झाले असून, त्यातून अभूतपूर्व अशी माहिती मिळेल.
जमिनीवरील दुर्बिणीतूनही निरीक्षण
यापूर्वी एचएच 211 चे जमिनीवरील दुर्बिणीतून निरीक्षण करण्यात आले होते. धनुष्यासारखे वक्राकार धक्के आपल्यापासून उत्तर-पश्चिमेला दूर जात आहेत. आपल्या दिशेने धक्क्याच्या तरंगाचा हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईडसारखी रचना तसेच एक गाठ असल्याचे यात दिसले. या व्यतिरिक्त सिलिकॉन मानॉक्साईडमध्ये द्विध्रुवीय वायू जोरात बाहेर पडत असल्याचे दिसून आले.