सेऊल,
उत्तर कोरियाचे हुकूमशहा Kim Jong Un किम जोंग उन सध्या रशियाच्या सुदूर पूर्व भागाच्या दौर्यावर असून त्यांनी शनिवारी रशियन पॅसिफिक ताफ्यातील अणू-सक्षम बॉम्बर, हायपरसोनिक क्षेपणास्त्रे प्रगत युद्धनौकेची पाहणी केली. या भेटीमुळे शस्त्रास्त्र युतीबद्दल पाश्चात्त्य देशांमध्ये चिंता वाढल्या आहेत, कारण या पाहणीमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्या युक्रेनवरील युद्धाला चालना मिळू शकते.
रेल्वेने प्रवास करीत किम जोंग उन आर्टिओम शहरात आल्यानंतर किम यांचे व्लादिवोस्तोक बंदर शहराच्या जवळील विमानतळावर आगमन झाले. यावेळी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु व वरिष्ठ लष्करी अधिकार्यांसह त्यांनी रशियाच्या धोरणात्मक बॉम्बर व इतर युद्धविमानांचे बारकाईने निरीक्षण केले.
शनिवारी Kim Jong Un किम यांना दाखवलेली सर्व रशियन युद्ध विमाने युक्रेनमधील युद्धात सकि‘यपणे वापरल्या गेलेल्या प्रकारांपैकी होती व यात टीयू-160, टीयू-95 व टीयू-22 बॉम्बरचा समावेश आहे. रशियाने नियमितपणे क्रूझ क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली आहेत. शोईगु यांनी किम यांना रशियाच्या नवीनतम क्षेपणास्त्रांपैकी एक मिग-31 फायटर जेटने वाहून नेलेले हायपरसॉनिक किंजला सुद्धा दाखवले. हे विमान अजूनही रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडे आहे.
व्लादिवोस्तोकमध्ये Kim Jong Un किम यांनी रशियाच्या पॅसिफिक ताफ्यातील अॅडमिरल शापोश्निकोव्ह फि‘गेटची पाहणी केली. रशियाचे नौदलाचे कमांडर, अॅडमिरल निकोलाई येवमेनोव्ह यांनी किम यांना जहाजाच्या क्षमता व शस्त्रास्त्रांची माहिती दिली. यात रशियन युद्धनौकांनी युक‘ेनमधील आक‘मणादरम्यान नियमितपणे वापर केलेल्या लांब पल्ल्याच्या कालिब‘ क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. रशिया दौर्यात किम जोंग उन यांनी बुधवारी पुतिन यांच्यासोबत सुमारे चार तासांहून अधिक वेळ चर्चा केली. या चर्चेदरम्यान उभय देशांमधील लष्करी सहकार्याला वेग आला आहे. यात उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र, क्षेपणास्त्र व इतर लष्करी उपक्रमांना पुढे जाण्यासाठी संभाव्य रशियन तंत्रज्ञानाची मदत होऊ शकेल.