नवयुवकांना सैन्यत करीअरसाठी प्रोत्साहन द्या : मिलिंद वाईकर

16 Sep 2023 19:13:22
पुणे,
वीर पत्नी, वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करून अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेने समाजभान ठेवून एक आदर्श निर्माण केला आहे. सैनिक सीमेवर जीवावर उदार होऊन लढत असतो. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी असे उपक‘म घेतले पाहिजे तसेच नवयुवकांना सैन्य दलात करीअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन पश्चिम प्रांत धर्मजागरण सहप्रमुख Milind Waikar मिलिंद वाईकर यांनी येथे केले.
 
 
pune-virmata
 
Milind Waikar : एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य (निवृत्त) यांनी, ही संस्था राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकार मान्यताप्राप्त असून, माजी सैनिकांसाठी, वीर नारी, वीर धर्मपत्नी यांच्या कल्याणासाठी काम करणारी असल्याचे सांगितले. एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमात कर्नल आर. आर. जाधव, ब्रिगेडिअर राजेश गायकवाड, वीरेंद्र महाजनी यांची मुख्य उपस्थिती होती. पुण्यातील धानोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये पुणे महानगरातून मोठ्या संख्येने वीर माता, वीर पत्नी उपस्थित होत्या. त्यांनी सर्वांना राख्या बांधल्या. सर्वांनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला व भेटवस्तू दिल्या. संचालन निवृत्त कॅप्टन अरविंद व जेसीओ शेषराव पाटील यांनी केले. सुरेश गोडसे व मातृशक्ती गर्गे यांचा माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांना सक्रिय मदत केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0