देशात 23 सैनिकी शाळांना परवानगी

    दिनांक :16-Sep-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
केंद्र सरकारने नवीन 23 Military schools सैनिकी शाळांना परवानगी दिली आहे. देशातील सर्व राज्यांत सैनिकी शाळांची सुविधा उपलब्ध व्हावी, या भूमिकेतून या शाळांना परवानगी देण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने देशात 100 सैनिकी शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्या मालिकेत पहिल्या टप्प्यात या 23 शाळांना मंजुरी देण्यात आली.
 
 
Military schools
 
या शाळा स्वयंसेवी संस्था, खाजगी शाळा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सैनिकी शाळा संघटनेने खाजगी शाळाशी सामंजस्य करारही केला आहे. यामुळे Military schools सैनिकी शाळा संघटनेने भागिदारी तत्त्वावर सुरू केलेल्या शाळांची संख्या 42 झाली आहे. याशिवाय देशात आणखी 33 सैनिकी शाळा कार्यरत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच लष्करी दलात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने सैनिकी शाळा चालवल्या जातात. देशभरातून आलेल्या अजार्र्ची छाननी करून पहिल्या टप्प्यात संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वातील समितीने 23 सैनिकी शाळांना अनुमती दिली आहे.