नागपूर झाले स्मार्ट, आजपासून डबल डेकर सुरु

    दिनांक :16-Sep-2023
Total Views |
नागपूर,  
double decker bus केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली आणि अशोक ले-लँड व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या डबल डेकर इलेक्ट्रिक बसचे आज गडकरी यांनी नागपूरमध्ये लोकार्पण केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष  दत्ता मेघे, अशोक ले-लँड लिमिटेडचे उपाध्यक्ष  यश सच्चर, स्विच मोबिलिटीचे सीईओ महेशबाबू , तसेच लोकप्रतिनिधी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
double decker bus
 
अशोक ले-लँडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिष्ठानला ही बस उपलब्ध करून देण्यात आली असून या बसचा ज्येष्ठ नागरिकांना विशेष फायदा होणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या निःशुल्क धार्मिक स्थळ तसेच पर्यटनस्थळांच्या सहलींसाठी या डबल डेकर ग्रीन बसचा उपयोग केला जाणार आहे. double decker bus सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानकडे सहल आदि उपक्रमांसाठी एक ग्रीन बस उपलब्ध असून ही बस मागील पाच वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत आहे. या बसच्या माध्यमातून शेगाव, माहूर, कळंब, आंभोरा, आदासा, धापेवाडा आदि धार्मिक स्थळांच्या निःशुल्क सहलीचा लाभ हजारो ज्येष्ठ नागरिकांनी घेतला आहे. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून प्रतिष्ठानला मिळालेल्या या दोन्ही बसमुळे ज्येष्ठ नागरिकांना सहलींचा आनंद लुटणे अधिक श्रेयस्कर झाले आहे.