- डिझेलसाठी मोजावे लागतात 329 रुपये
इस्लामाबाद,
आर्थिक संकट आणि डोक्यावर कर्जाचे प्रचंड ओझे असलेल्या Pakistan in Petrol पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती विक‘मी पातळीवर गेल्या आहेत. देशातील काळजीवाहू सरकारने शुक‘वारी पेट्रोलच्या प्रती लिटर किमतीत 26 रुपयांची आणि डिझेलच्या किमतीत 17 रुपयांनी वाढ केली. यामुळे येथील लोकांना पेट्रोलसाठी 331 रुपये आणि डिझेलसाठी 329 रुपये मोजावे लागत आहेत. जागतिक बँकेसोबत केलेल्या करारानुसार पाकिस्तान सरकारला इंधनासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ करणे भाग पडत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे येथील जनतेला प्रचंड महागाईचा सामना करावा लागत आहे. महाग इंधनामुळे दळणवळणाचा खर्च वाढल्याने त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तू महाग होण्यात होत आहे. यामुळे येथील लोकांचा सरकारवर प्रचंड रोष आहे.
Pakistan in Petrol : गेल्या आठवड्यात आर्थिक समन्वय समितीने पेट्रोलियम डीलर्स आणि तेल विपणन कंपन्यांचे मार्जिन वाढवण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री मार्जिनमध्ये प्रती लिटर 3.5 रुपयांनी वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली. आता सरकारने इंधन दरवाढ केल्यामुळे पेट्रोलचे दर प्रती लिटर 331 रुपये 38 पैसे तसेच डिझेलचे दर 329 रुपये 18 पैसे लिटर झाले आहे. पाकिस्तान सरकारने मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती या दरवाढीसाठी कारणीभूत ठरली असल्याचे म्हटले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने, आम्हालाही दरवाढ करावी लागल्याचे सरकारने म्हटले आहे.
अन्नधान्य महागाई 38.5 टक्क्यांवर
आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानातील महागाईचा दर ऑगस्टमध्ये 27.38 टक्के होता. त्यातच खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने अन्नधान्य महागाईचा दर 38.5 टक्क्यांवर गेला आहे.