राघव बोटीतून आणणार लग्नाची वरात !

    दिनांक :16-Sep-2023
Total Views |
जयपूर,  
Raghav Chadha आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढा नववधू परिणीती चोप्राला आणण्यासाठी बोटीतून उदयपूरला लग्नाची वरात  आणणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर रोजी वरात निघणार आहे. याआधी पिचोला तलावाच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल ताजमध्ये राघवच्या सेहरा बंदीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर ताज हॉटेलमधून वधू परिणीतीला घेण्यासाठी राघवसोबत लग्नाची वरात  निघेल.
 
Raghav Chadha
 
लग्नाची वरात Raghav Chadha बोटीने निघून जवळच्या हॉटेल लीला येथे पोहोचेल. त्याची तयारीही जोरात सुरू आहे. बोटींच्या सजावटीतही मेवाडी परंपरेची झलक पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लीला पॅलेस हॉटेल पिचोला तलावाजवळ आहे. त्याच्या सूटमधून तलाव, ताज हॉटेल, सिटी पॅलेस इत्यादी दिसतात. वधू-वरांसाठीच्या खोल्यांशिवाय हॉटेलमधील पाहुण्यांसाठी बुक केलेल्या स्वीट्सचीही सुंदर रचना करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये तीन खास लग्नाची ठिकाणे आहेत. मेवाड, मेवाड टेरेस आणि मारवाड, ज्यामध्ये लग्नाचे सर्व विधी होतील.वास्तविक, हॉटेलमधील खोल्या 8 श्रेणींमध्ये विभागल्या आहेत, ज्यांचे दररोजचे भाडे 47,000 ते 10 लाख रुपये आहे.