वैनगंगा नदीला पूर, शेतजमीन पाण्याखाली

*काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

    दिनांक :16-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
ब्रह्मपुरी, 
Wainganga river floods : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे दोन मीटरने व 16 दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले असून, नदी काठावरील शेतजमिनी पाण्याखाली आल्या आहे. तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वैनगंगा नदी काठावरील गावांतील नागरिकांना शासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नाले, नदीतून अवागमन करू नये, अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.
 
Wainganga river floods
 
15 सप्टेंबर 2023 रोजी गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने (Wainganga river floods) वैनगंगा नदी फुगली असून, मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत आहे. शिवाय पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे नाले, कालव्याला होत आहे. या पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील रनमोचन, खरकाडा (पिंपळगाव), जुगनाळा, किन्ही, मांगली, बेटाळा, बोळेगाव अर्‍हेरनवरगाव, कोल्हारी, बेलगाव, लाडज, पिंपळगाव, चिकलगाव, भालेश्वर, सोंदरी, सावरगाव, चिकलगाव, सोनेगाव, आधी गावासह बरेच शेतकर्‍यांच्या शेतजमिनी पुराच्या पाण्याखाली आल्या असून हजारो शेतकर्‍यांचे धानपीक भाजीपाल्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नदी लगतच्या अनेक गावात पाणी शिरल्याने ग्रामीण परिसरातील अनेक रस्ते बंद आहेत.